Delhi Pune Flight : दिल्ली - पुणे विमानात भयंकर घडलं! प्रवाशांची घुसमट झाली, घाम फुटला अन्...

Delhi Pune Flight Update News : स्पाइसजेटच्या दिल्ली-पुणे विमानात अचानक तापमान वाढल्याने प्रवाशांना घुसमट आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याचा आरोप. तांत्रिक बिघाडाच्या दाव्यानंतर चौकशीची मागणी.
SpiceJet Delhi-Pune Flight Faces Passenger Safety Concerns
SpiceJet Delhi-Pune Flight Faces Passenger Safety ConcernsSaam Tv
Published On
Summary
  • दिल्ली-पुणे SpiceJet मधील मोठी दुर्घटना टळली

  • उड्डाणानंतर तापमानात अचानक वाढ झाल्याने प्रवासी गुदमरले

  • प्रवाशांकडून विमान कंपनीवर गंभीर आरोप

दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीतून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या स्पाइसजेट या विमानाच्या उड्डाणानंतर मोठी दुर्घटना घडली. विमानातील प्रवाशांना विमानात बसल्यानंतर अचानक तापमान वाढलं आणि प्रवाशांची अक्षरशः घुसमट झाली. तापमान वाढतच गेल्याने अनेक प्रवासी घामाने पूर्णपणे भिजले. काही प्रवाशांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. दरम्यान प्रवाशांना होत असलेला त्रास लक्षात येऊन सुद्धा विमान रणवेवर घेण्यात आल्याचा गंभीर आरोप एका प्रवाशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. याप्रकरणी आता विमान कंपनीची चौकशी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

व्हायरल झालेल्या एका सोशल मीडिया पोस्टनुसार, स्पाइसजेट या नामंकित कंपनीचे विमान दिल्लीहून पुण्याकडे निघाले होते. प्रवासी विमानात बसले. यानंतर हळूहळू विमानाने टेक ऑफ घेण्यास सुरुवात केली. यानंतर जे घडलं ते हादरवून टाकणार होत. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात तापमान वाढलं आणि प्रवाशांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. काही प्रवासी अक्षरशः घामाने चिंब भिजले होते.

परिस्थिती असह्य झाल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरडा करत विमान पुढे घेऊन जाण्यास विरोध केला. अशा परिस्थितीत विमान उडवणे धोकादायक असल्याचे सांगत सर्व प्रवाशांनी उड्डाणास नकार दिला. यावेळी कॅप्टन आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांशी अरेरावी करण्यात आली आणि धमकावल्याचा आरोपही काही प्रवाशांनी केला आहे.

SpiceJet Delhi-Pune Flight Faces Passenger Safety Concerns
Mosquito Bites : डास शोधून शोधून तुम्हालाच का चावतात? समोर आले धक्कादायक कारण

यानंतर विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वाढलेल्या तापमानाचा प्रकार आणि प्रवाशांना झालेला त्रास अधिक गंभीर बनला आहे. या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी विमानतळावरच ठिय्या मांडला. खराब सेवा देऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेशी खेळल्याचा आरोप स्पाइसजेटवर करण्यात आला आहे. या प्रकरणाची केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.दरम्यान आता सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com