Dallas Horror: Indian man Chandram Nagamallaiah brutally murdered in front of wife and son 
देश विदेश

Axe Attack : भयानक! पत्नी अन् मुलासमोरच कुऱ्हाडीनं शीर केलं धडावेगळं, अमेरिकेत भारतीय व्यक्तीची निर्घृण हत्या

Indian man murdered USA : वॉशिंग मशीन वापरावरून झालेल्या वादातून आरोपीने निर्घृण हत्या केली. ही हत्या अमेरिकेतील डलास शहरात पार्किंगमध्ये घडली. हत्या झालेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव चंद्र नागमल्लैया आहे.

Namdeo Kumbhar

  • डलास (अमेरिका) मध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तीची पत्नी आणि मुलासमोर निर्घृण हत्या.

  • वॉशिंग मशीन वापरावरून झालेल्या वादातून कुऱ्हाडीने शीर धडावेगळं करण्यात आलं.

  • हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव चंद्र नागमल्लैया असून तो पळण्याचा प्रयत्न करत होता.

  • आरोपीला पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली, याआधीही त्याचे गंभीर गुन्हे समोर आले आहेत.

Indian man killed Dallas, brutal axe attack America : अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. पार्किंगमध्ये पत्नी आणि मुलासमोरच शीर धडावेगळं करत क्षणात होत्याचं नव्हतं केले. अमेरिकेतली डलास शहरात ही धक्कादायक घटना घडली. हत्या झालेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव चंद्र नागमल्लैया असं आहे. वॉशिंग मशीन वापरावरून वाद झाला होता. त्यातूनच योर्डानिस कोबोस-मार्टिनेज याने कुऱ्हाडीने डोकं कापलं. आरोपी इतक्यावरच थांबला नाही, शीर धडावेगळं केल्यानंतर त्याला लाथ मारली अन् कचऱ्यात फेकलं.

वाशिंग मशीन वापरू नकोस, ही गोष्ट नागमल्लैया याने डायरेक्ट का सांगितली नाही? यामुळे योर्डानिस कोबोस-मार्टिनेज याचा राग अनावर झाला. दुसऱ्याकडून ऑर्डर मिळाल्यामुळे योर्डानिस संतापला होता. त्यामुळे रागाच्या भरात त्याने कुऱ्हाडीने नागमल्लैया याच्यावर सपासप वार केले.

नागमल्लैया याने योर्डानिस याच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी पार्किंगमधून ऑफिसकडे पळण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. योर्डानिस याने नागमल्लैया याला गाठात भयंकर हल्ला चढवला. नागमल्लैया याच्या पत्नी अन् मुलाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण योर्डानिस याच्या डोक्यात सैतान गेला होता. त्याने कुऱ्हाडीने सपासप वार करत नागमल्लैया याचं शीर धडावेगळं केलं. त्यानंतर त्याने जोरात लाथही मारली. त्याचा राग इतक्यावरच शांत झाला नाही, त्याने नागमल्लैया याचं डोकं कचऱ्यात फेकलं.

नागमल्लैया याच्या हत्येची बातमी पोलिसांना तात्काळ समजली. पोलिसांनी तात्काळ घटानस्थळी धाव घेतली. आरोपीला कुऱ्हाडीसह पोलिसांनी अटक केली. नागमल्लैया याच्या त्याच्या बायको अन् मुलासमोरच हत्या करण्यात आली. कोबोस-मार्टिनेज याने याआधीही गंभीर गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी हत्याचा गुन्हा नोंदवला असून त्याला कोर्टात हजर कऱण्यात येणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT