Pune Crime : बंडू आंदेकरला मध्यरात्री पोलिसांनी इंगा दाखवला, नाना पेठेत आणलं अन्....

Bandu Andekar House Search : बंडू आंदेकरच्या घरातून पोलिसांनी ६७ लाखांचे सोन्याचे दागिने, २.५ लाख रोकड, एक अलिशान मोटार, करारनामे व पावत्या जप्त केल्या. ५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत गोळ्या झाडून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली.
Bandu Andekar House Search
Pune Police raid gangster Bandu Andekar’s house in Nana Peth; gold, cash, and luxury car seized in Ayush Komkar murder probe.Saam TV Marathi News
Published On
Summary
  • पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांची झडती.

  • झडतीत सोनं, रोकड, कार व करारनामे जप्त.

  • आयुष कोमकर हत्येच्या तपासात पोलिस कारवाई.

  • आतापर्यंत ८ संशयितांना अटक, गुन्हे शाखेकडे तपास सोपवला.

pune gangster Bandu Andekar Nana Peth House : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याला पोलिसांनी आपला इंगा दाखवला आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात तपास वेगात सुरू आहे. त्यासंदर्भात आणखी काही धागेदोरे मिळतात का, हे पाहण्यासाठी बंडू आंदेकर याला मध्यरात्री नाना पेठेत आणलं. त्याच्या घराची झाडाझडती पोलिसांनी घेतली. कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या घराची पोलिसांनी घेतलेल्या झडतीत कोट्यवधी रुपयांचा ऐवज हाती लागलाय. पोलिसांनी तब्बल ६७ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने. २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, एक अलिशान मोटार कार, विविध करारनामे आणि कर भरल्याच्या पावत्या, असा मोठा मुद्देमाल जप्त केलाय. त्याशिवाय आंदेकरने केलेल्या जमीन व्यवहाराच्या काही पावत्याही पोलिसांना मिळाल्या आहेत.

Bandu Andekar House Search
Uddhav Thackeray Setback : ठाकरेंच्या शिवसेनेला जबरी धक्का, रायगडमधील शिलेदाराने साथ सोडली

१९ वर्षाच्या आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर याची गणपती विसर्जनाच्या आदल्या रात्री हत्या करण्यात आली होती. आयुषच्या खुनाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. गृहकलहातून बंडू आंदेकरने स्वतःच्याच नातवाच्या हत्येचा कट रचला होता. ५ सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला रात्री साडेसातच्या सुमारास नाना पेठेत हल्लेखोरांनी आयुष कोमकरवर गोळ्यांचा वर्षाव केला. गंभीर जखमी झालेल्या आयुष्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. खुनानंतर आंदेकर कुटुंबासह प्रवास करून देवदर्शनासाठी निघाला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 8 लोकांना बेड्या ठोकल्या आहेत.

Bandu Andekar House Search
Latur OBC News : मराठा आरक्षणासाठी GR, ओबीसी तरूणाने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीत काय लिहिले?

गुंड बंडू आंदेकरला पोलिसांनी आयुषच्या हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी बेड्या ठोकल्या होत्या. आंदेकरला पोलिसांनी कोर्टात हजर केले. त्यावेळी त्याने मी माझ्या नातवाला का मारू असा उलट प्रश्न विचारला होता अन् या हत्येशी माझा संबंध नसल्याचे सांगितलं होतं. मात्र पोलीस तपासातून ही हत्या वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच करण्यात आल्याचे समोर आलेय.

Bandu Andekar House Search
मुंबईच्या आफताबसह ८ जणांच्या मुसक्या आवळल्या, दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, राजधानीत अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com