female doctor x
देश विदेश

Shocking : हॉस्पिटलमध्ये पुरूष रुग्णांचा लैंगिक छळ; चुंबन, शरीरसबंध ठेवणारी डॉक्टर महिला दोषी

Shocking Incident :रुग्णाचे लैंगिक शोषण करणे, अनुचित वर्तन करणे अशा गंभीर गुन्ह्यांच्या अंतर्गत एका भारतीय वंशाच्या महिला डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आला आहे. ही घटना कॅनडामध्ये घडली आहे.

Yash Shirke

  • महिला डॉक्टरचा पुरुष रुग्णांवरील लैंगिक शोषणप्रकरणी परवाना रद्द.

  • चुंबन, शरीरसंबंध आणि अनुचित वर्तन केल्याचे गंभीर आरोप सिद्ध.

  • समितीचे डॉक्टर-रुग्ण लैंगिक संबंधांवर शून्य सहनशीलतेचे धोरण स्पष्ट.

Shocking News : भारतीय वंशाच्या एका महिला डॉक्टरचा कॅनडामध्ये वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आला आहे. एका पुरुष रुग्णाचे लैंगिक शोषण आणि दोन रुग्णांसोबत अनुचित वर्तन केल्याप्रकरणी या महिला डॉक्टरला दोषी ठरवण्यात आले आहे. नॅशनल पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरने या रुग्णांसमोर प्रेम व्यक्त केले होते. रुग्णांशी वैयक्तिक, खासगी आणि व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले होते.

कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन ऑफ ओंटारियोच्या समीक्षा समितीने या महिला डॉक्टरच्या वर्तनाची चौकशी केली. ही महिला डॉक्टर तिच्या रुग्णांना फक्त रुग्ण म्हणून पाहत नव्हती. ही डॉक्टर तिच्या रुग्णांना मित्र, जीवनातील सहकारी, व्यावसायिक भागीदार वगैरे मानत होती, असा निष्कर्ष समितीने काढला आहे. डॉक्टर आणि रुग्णांमध्ये लैंगिक संबंध, जरी ते दोघांच्या संमतीने झाले तरी, संस्थेचे धोरण त्याविरुद्ध असून त्याला अजिबात परवानगी नाही, असे समितीने स्पष्ट केले आहे.

भारतीय वंशाच्या महिला डॉक्टरचे एका रुग्णाशी लैंगिक संबंध होते. याशिवाय इतर रुग्णांशी खासगी, वैयक्तिक संबंध होते. रुग्णालयातील दोन रुग्णांशी तिची व्यावसायिक भागीदारी देखील होती, असे समीक्षा समितीच्या पॅनलने म्हटले आहे. या निर्णयाविरुद्ध अपील करायची इच्छा महिला डॉक्टरने व्यक्त केली आहे.

नॅशनल पोस्टला दिलेल्या निवेदनात महिला डॉक्टरने अनेक खुलासे केले. सार्वजनिक सुनावणीदरम्यान या प्रकरणातील अनेक तथ्ये लपवली गेली. माझी बाजू जगासमोर यावी यासाठी मला आणि माझ्या पालकांना मोठा आर्थिक आणि वैयक्तिक त्याग करून या सुनावणीला उपस्थित राहावे लागले. मी पारंपारिक भारतीय संस्कारांमध्ये वाढली आहे. जिम ट्रेनरसोबतचे संबंध हे आमच्या नात्याचा एक भाग आहे, असे महिला डॉक्टरने म्हटले आहे.

महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये रुग्णांसोबत सामाजिक कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमांमध्ये दारु प्यायली जात असे, प्रोकेन वापरले जात असे. प्रोकेन हे साधारणपणे भूल किंवा मज्जातंतू ब्लॉकसाठी वापरले जाते. कार्यक्रमांदरम्यान डीप टिश्यू थेरपी केल्याचा आरोप एका जिम ट्रेनरने या महिला डॉक्टरवर केला आहे.

२००१ मध्ये फॅमिली डॉक्टर म्हणून या महिला डॉक्टरने प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली. कॅनडामध्ये घर विकत घेऊन त्याच ठिकाणी खासगी क्लिनिक सुरु केले. २०१५ मध्ये, ही महिला डॉक्टर एका स्थानिक जिममध्ये सामील झाली, जिथे एक जिम ट्रेनर नंतर तक्रारदार बनली. ट्रेनरने सांगितले की, मला सुरुवातीला खुल्बेकडून व्हिटॅमिन थेरपी मिळाली, जी नंतर स्नायूंच्या रिकव्हरीसाठी फिजिकल थेरपीमध्ये बदलली.

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, महिला डॉक्टरने माझ्या प्रायव्हेट पार्ट्सना स्पर्श करुन श्वसनाचे व्यायाम करायला लागले. ओरल सेक्स, किस, मॅन्युअल स्टिम्युलेशन यांचा थेरपीमध्ये समावेश केला, असे आरोप जिम ट्रेनरने केले आहेत. या दरम्यान मी प्रोकेनच्या प्रभावाखाली असल्याचेही जिम ट्रेनरने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT