Sunita williams Saam tv
देश विदेश

Sunita williams : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर परतणार; नासाने थेट तारीख सांगितली

space missions : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. त्यांचे सहकारीही परतणार आहेत. नासाने अधिकृत तारीख सांगितली आहे.

Vishal Gangurde

नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर या दोघांनी पृथ्वीवर परतण्याचा प्रवास सुरु केला आहे. दोघेही बोईंग स्टारलायनरच्या चाचणीसाठी मोहिमेवर गेले आहेत. गेल्या ९ महिन्यांपासून दोघे अंराळात आहेत. आता दोघेही पृथ्वीवर १६ मार्च रोजी परतणार असल्याची अधिकृत माहिती नासाने दिली आहे.

सुनीता विलयम्स आणि बॅरी विल्मोर यांच्या यानात बिघाड झाला होता. त्यामुळे दोघेही अंतराळात अडकले होते. परंतु आता त्यांचा परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सुनीता विलयम्स आणि बॅरी विल्मोर यांनी क्रू १० मिशन हे पृथ्वीतलावर लाँच करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. विलयम्स आणि बॅरी विल्मोर दोघांनी क्रू फ्लाइट टेस्ट ५ जून रोजी लाँच केलं. त्यानंतर प्लाईटच्या कॅप्सूलमध्ये तांत्रिक बिघाड जाणवत होता. त्यामुळे ते आयएसएसवर राहत होते. स्टारलायनर अंतराळवीर गेल्या १० दिवसांपासून कॅप्सूलच्या बिघाडाचा सामना करत होते.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्टारलायनर अंतराळयान क्रूशिवाय परतले होते. त्यानंतर काही आठवड्यानंतर नासाचे अंतराळवीर निक हेग आणि अलेक्साझांडर गोर्बुनोव्ह यांना स्पेसएक्स क्रू-९ मोहिमेवर पाठवण्यात आले होते. ड्रॅगन अंतराळयानातील दोन जागा अडकलेल्या अंराळीवीरांसाठी राखीव प्रक्षेपित करण्यात आलं. ते दोघे फेब्रुवारीमध्ये परतणार होते. आता हे चौघेही १६ मार्च रोजी परतणार आहेत.

दरम्यान, क्रू-१० मिशनमध्ये नासाचे ४ अंतराळवीर आहेत. या मोहिमेत जपान एरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सीचे अंतराळवीर देखील आहेत. क्रू-१० च्या आगमनानंतर दोन्ही अंतराळवीर आठवडाभर चालणाऱ्या हस्तांतरण प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. त्यानंतर एक नवीन अंतराळ स्थानक कमांडर पदभार स्वीकारणार आहे. सध्या सुनीता विल्यम्स या फ्लाइंग लॅबोरेटरीच्या कमांडर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT