दुसऱ्या देशातील प्रमुख नेत्यांसाठी मोठी सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे. जी२० शिखर परिषदेवर कोणत्याच प्रकारचा ड्रोन हल्ला होऊ, नये यासाठी डीआरडीओनं स्वदेशी अँटी-ड्रोन यंत्रणा डिप्लोमॅटिक एन्क्लेवर तैनात करण्यात आलंय. डीआरडीओसह भारतीय लष्कर (Indian Army) आणि सुरक्षा यंत्रणा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलीय. दरम्यान भारतीय लष्कराकडून तैनात करण्यात आलेलं अँटी-ड्रोन यंत्रणाची काय ताकद आहे, त्याची काय वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घेऊ..(Latest News on G20 Summit)
दिल्लीमध्ये जी२० शिखर परिषद होत आहे. या परिषदेसाठी इतर देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर व्हीआयपी व्यक्ती दिल्लीमध्ये दाखल झालेत. तर काहीजण येत आहेत. या नेत्यांवर कोणत्याच प्रकारचा हल्ला होऊ नये यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. या नेत्यांवर ड्रोनवर हल्ला होऊ नये, यासाठीही मोठी सुरक्षा ठेवलीय. दरम्यान राजधानी दिल्लीमध्ये कोणत्या देशांचे प्रमुख उपस्थीत असतात. तेव्हा त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांवर असते.
यासाठी डिप्लोमॅटिक एनक्लेवजवळ भारतीय संरक्षण संशोधन संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय लष्करानं स्वदेशी अँटी-ड्रोन सिस्टीम तैनात केलीय. या काउंटर ड्रोन सिस्टीमही म्हणून ओळखलं जातं. ही यंत्रणा दोन प्रकारचे तंत्रानं काम करते. पहिल्या तंत्रज्ञानाला सॉफ्ट किल म्हणजेच ड्रोन संचार बंद करत असते. म्हणजे ड्रोन रिमोट किंवा कॅम्प्यूटरनं उडवलं जातं. त्यापासून ड्रोनचा संपर्क तोडला जातो.
यामुळे ड्रोन दिशाहीन होत असते आणि खाली पडते. दरम्यान रिमोट किंवा कॅम्प्यूटरचा ड्रोनशी असलेला संपर्क तुटल्यास तो तुटून जात असतो, यामुळे ते काम करणं बंद करते. या यंत्रणेचे दुसरे तंत्रज्ञानाला हार्ड किल म्हणजेच ड्रोन काउंटर सिस्टीमच्या क्षेत्रात आले तर त्यावर लेझरनं हल्ला केला जातो. यामुळे ड्रोनमधील इलेक्ट्रिक यंत्रणा खराब होत असते. लेझर सिस्टीम कोणता मोठा धमाका न करता ड्रोन पाडला जातो. या अँटी-ड्रोन सिस्टीमची रेंज चार किलोमीटर आहे.
म्हणजेच या यंत्रणेच्या रेंजमध्ये आल्यानंतर शत्रूचं ड्रोन पाडण्यात येतं. दरम्यान मागील वर्षी डिसेंबर महिन्यात २०२१मध्ये डीआरडीओच्या अशा पाच सिस्टीमचा भारतीय लष्कारात समावेश करण्यात आल्या. हे ड्रोन सिस्टीम अनमॅन्ड एरिअल व्हीकल म्हणजेच ड्रोन्स शोधून त्याला नष्ट करत असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.