>> प्रमोद जगताप, साम टीव्ही
Drone flying Over Prime Minister's Residence in Delhi: पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावरून ड्रोन कॅमेरा उडवल्याची घटना समोर आली आहे. नो फ्लाईंग झोन असतानाही या ठिकाणी ड्रोन कॅमेरा उडवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एसपीजीने दिल्ली पोलिसांना याबाबात दिली माहिती आहेत.
पहाटे साडेपाचच्या वाजण्याच्या सुमारास हा ड्रोन कॅमेरा उडवण्यात आला अशी माहिती आहे. सुरक्षा यंत्रणांकडून यासंदर्भात कसून शोध सुरू आहेत. हा ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तीचा तापस सुरक्षा यंत्रणांकडून घेण्यात येत आहे. नवी दिल्ली परिसरातील सर्व अधिकारी आणि भरारी पथकांनी ड्रोनचा शोध सुरू केला
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकही ड्रोन सापडलेला नाही. हे ड्रोन कोणाचे होते आणि ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी कसे पोहोचले याचा तपास पोलीस करत आहेत. पंतप्रधानांचे निवासस्थान आणि आजूबाजूचा परिसर नो फ्लाईंग झोनमध्ये येतो.
पोलिसांनी काय सांगितले?
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, "पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ एका अनोळखी उडत्या वस्तूची माहिती NDD नियंत्रण कक्षाला मिळाली होती. आजूबाजूच्या परिसरात व्यापक शोधमोहीम राबवण्यात आली. परंतु अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (ATC)) देखील संपर्क साधण्यात आला, परंतु त्यांनाही पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ अशी कोणतीही उडणारी वस्तू सापडली नाही." (Breaking News)
पंतप्रधान निवासस्थानी असते कडक सुरक्षा व्यवस्था
पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा प्रवेश 9, लोककल्याण मार्गावरून आहे. या ठिकाणी कड सुरक्षा व्यवस्था असते. याठिकाणी पंतप्रधानांना भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीचे वाहन आधी पार्किंगमध्ये लावली जाते, नंतर त्या व्यक्तीला रिसेप्शनवर पाठवले जाते, त्याची सुरक्षा तपासणी केली जाते. त्यानंतर ती व्यक्ती ७, ५, ३ आणि १ लोककल्याण मार्गावर प्रवेश घेते. (Latest Political News)
पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचण्यासाठी सुरक्षा तपासणी इतकी कडक असते की त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील आले तरी त्यांनाही या प्रक्रियेतून जावे लागते. पंतप्रधान निवासस्थानी प्रवेश देण्यापूर्वी सचिवांच्या वतीने भेटणाऱ्यांची यादी तयार केली जाते. ज्या व्यक्तींचे नाव यादीत असेल ते फक्त पंतप्रधानांना भेटू शकतात. तसेच पंतप्रधानांना भेटायला जाणार्या व्यक्तीकडे ओळखपत्र असणे आवश्यक असते. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.