Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSaamTv

Maharashtra Political Crisis: गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुला दगा देण्यात आला; संजय राऊतांचा हल्लाबोल

Maharashtra Political Crisis: 'गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुला दगा देण्यात आला, अशी टीका राऊत यांनी केली केली.
Published on

प्रमोद जगताप

New Delhi: राज्यातील राजकीय भूकंपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी बंड करत सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. अजित पवारांच्या निर्णयामुळे शरद पवारांना धक्का बसला आहे. या सर्व राजकीय घडमोडींवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर हल्लाबोल केला आहे. 'गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुला दगा देण्यात आला, अशी टीका राऊत यांनी केली केली. (Latest Marathi News)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. संजय राऊत म्हणाले, 'आज गुरुपौर्णिमा आहे. आमचे गुरू बाळासाहेब ठाकरे यांना वंदन. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुला दगा देण्यात आला. काल समृद्धी महामार्गावर अपघात झाला. त्यांच्या चिता जळत असताना ज्या राजभवनावर शपथविधी जल्लोषात साजरा झाला हे निर्दयी आहे'.

Sanjay Raut News
Maharashtra Politics: राष्ट्रवादीत संघर्ष! अजित पवारांच्या बंडानंतर कार्यकर्त्यांचा थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच दावा

'प्रेत पडलेली आहेत, नातेवाईकांचा आक्रोश आहे आणि इकडे राजभवनात हे लोक पेढे वाटत होते, मिठ्या मारत होते. या सगळ्यांना याची किंमत चुकवावी लागणार आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

'महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, इतिहासातून बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, यशवंतराव चव्हाण यांचा इतिहास पुसण्यासाठी हे घाणेरडं राजकारण सुरू आहे. हा खेळ सुरू आहे, तो लोकशाही आणि देशाला परवडणारा नाही, असेही राऊत पुढे म्हणाले.

Sanjay Raut News
Devendra Fadnavis News: 'महाराष्ट्राचा महाचाणक्य'; राजकीय भूकंपानंतर देवेंद्र फडणवीसांना नवी उपाधी, नागपुरात झळकले बॅनर्स

शिंदे गटावर टीका करताना राऊत म्हणाले, 'सध्याचे मुख्यमंत्री आणि सोबतचे १६ आमदार घरी जाणार आहरे. ते अपात्र ठरणार आहे. १० ऑगस्टपर्यंत हा निर्णय घ्यावा लागेल, त्यासाठी ही तयारी सुरू आहे'. संजय राऊतांनी टीका केल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे आता पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com