Maharashtra Politics: राष्ट्रवादीत संघर्ष! अजित पवारांच्या बंडानंतर कार्यकर्त्यांचा थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच दावा

Ajit Pawar vs Sharad Pawar News: नागपूरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दावा केल्याचं समोर आलं आहे.
Maharashtra Political Storm, Ajit Pawar and Sharad Pawar
Maharashtra Political Storm, Ajit Pawar and Sharad PawarSAAM TV
Published On

Ajit Pawar vs Sharad Pawar Maharashtra Politics News: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह पक्षातून बंड केलं. या बंडानंतर आता त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयावर आपला दावा सांगण्यास सुरूवात केली आहे. नागपूरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दावा केल्याचं समोर आलं आहे.

Maharashtra Political Storm, Ajit Pawar and Sharad Pawar
MNS Vasant More News: हिंम्मत असेल तर मनसेच्या वाघाला विरोधीपक्षनेता करा; वसंत मोरे यांचं थेट विरोधकांना चॅलेंज

राष्ट्रवादीच्या ओबीसी सेवेच्या माजी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी अजित पवार यांना समर्थन दर्शवलं असून आम्ही कार्यकर्ते अजितदादांसोबत आहोत आणि हे कार्यालय आम्हा कार्यकर्त्यांचं आहे, असं म्हणत थेट राष्ट्रवादीच्या नागपुरातील कार्यालयावर आपला दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

विशेष बाब म्हणजे अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आपला दावा केला आहे. आगामी सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसचा चिन्हावर आम्ही लढणार आहोत. तसेच विधिमंडळातही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Maharashtra Political Storm, Ajit Pawar and Sharad Pawar
Eknath Shinde News: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप? शिंदे गटाने बोलावली तातडीने बैठक

आता अजित पवार यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या नागपूर येथील कार्यालयावर आपला दावा सांगितला आहे. यावरून सुद्धा मोठा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नागपुरातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून ज्या पद्धतीने शिवसेना गेली, त्या पद्धतीने शरद पवार यांच्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस जाणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांना समर्थन दर्शवलेल्या महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी शिवसेनेच्या कार्यालयावर आपलाच दावा असल्याचं म्हणत अनेक कार्यालये ताब्यात घेतली होती. त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com