Eknath Shinde News: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप? शिंदे गटाने बोलावली तातडीने बैठक

CM Eknath Shinde called meeting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी तातडीने आपल्य गटातील आमदार तसेच मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील बाळासाहेब भवनात दुपारी ४ वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे.
CM Eknath Shinde called a Shiv Sena mla meeting After Ajit Pawar oath deputy cm maharashtra politics
CM Eknath Shinde called a Shiv Sena mla meeting After Ajit Pawar oath deputy cm maharashtra politicsSaam TV
Published On

Maharashtra Political Latest news: राज्याच्या राजकारणात रविवारी मोठी राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी थेट राज्यपाल भवन गाठत उपमुख्यमंत्रीपदाची तर ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून उलट सूलट चर्चांना उधान आलं आहे.

CM Eknath Shinde called a Shiv Sena mla meeting After Ajit Pawar oath deputy cm maharashtra politics
Maharashtra Politics: अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी गेले नाहीत; लवकरच... सामनातून खळबळजनक दावा

 अजित पवार  (Ajit Pawar) यांना सरकारमध्ये सामील करून भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पर्याय शोधत आहे, अशीही चर्चा राज्यात सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी तातडीने आपल्य गटातील आमदार तसेच मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील बाळासाहेब भवनात दुपारी ४ वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे.

दरम्यान, या बैठकीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील मंत्री तसेच आमदार खासदारांसह सर्व पदाधिकारी दुपारी २ वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेणार आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर शिंदे गटात मोठी नाराजी असल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून (Shivsena) बंड केल्यानंतर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकारमध्ये राहायचं नव्हतं, बाळासाहेब ठाकरे यांची ही शिकवण नाही, असं म्हणत शिंदे गटातील आमदारांनी आतापर्यंत हिंदुत्वाचा दाखला दिला.

CM Eknath Shinde called a Shiv Sena mla meeting After Ajit Pawar oath deputy cm maharashtra politics
Maharashtra Politics: शरद पवार अजित पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत; आखली नवी रणनिती

त्याचबरोबर अजित पवार हे राष्ट्रवादीच्याच आमदारांना जास्त निधी देत होते, मुख्यमंत्रीपद वगळता उद्धव ठाकरे यांच्या हातात सरकारमधील काहीही नव्हतं, असा दावाही शिंदे गटातील आमदारांनी केला होता. त्याचबरोबर भाजपसोबत जाऊन आपण हिंदुत्व कायम राखलं, असा दावाही शिंदे गटातील आमदारांनी केला होता.

आता अजित पवार हेच शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार नाराज झाले असल्याची चर्चा आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्याआधीच मंत्रिपद मिळाल्याने शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचं बोललं जातंय. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीत आमदार आपली नाराजी व्यक्त करतात का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com