MNS Vasant More News: हिंम्मत असेल तर मनसेच्या वाघाला विरोधीपक्षनेता करा; वसंत मोरे यांचं थेट विरोधकांना चॅलेंज

Vasant More News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत सूचक विधान केलं आहे.
Maharashtra Politics MNS MLA Raju Patil Make Leader of Opposition in Legislative Assembly Vasant More shocking demands
Maharashtra Politics MNS MLA Raju Patil Make Leader of Opposition in Legislative Assembly Vasant More shocking demands Saam TV
Published On

MNS Vasant More News: राज्याच्या राजकारणात रविवारी (३ जुलै) दुपारी मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा देत थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना घेऊन अजित पवारांनी विधानभवन गाठत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

अजित पवारांच्या (Ajit Pawar) या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांची तातडीने विरोधपक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे.

Maharashtra Politics MNS MLA Raju Patil Make Leader of Opposition in Legislative Assembly Vasant More shocking demands
Eknath Shinde News: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप? शिंदे गटाने बोलावली तातडीने बैठक

या संपूर्ण राजकीय परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांनी फेसबुक पोस्ट करत सूचक विधान केलं आहे. हिम्मत असेल तर मनसेचे आमदार राजू पाटील यांना विरोधी पक्ष नेता करा, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

"सत्ताधारी तुम्हीच आणि विरोधी पक्षात पण तुम्हीच. हिम्मत असेल तर मनसेच्या या विधानसभेतील वाघाला किमान एकदा विरोधी पक्षनेता तरी करा मग तुम्हाला कळेल विरोधी पक्षनेत्याची दहशत काय असते, आमचं आपलं बरं आहे बाबा छोटे कुटुंब सुखी कुटुंब" अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली आहे

"पार पार राजकारणावरचा विश्वास उडालाय राव, लांब कुठं तरी जंगलात जाऊन शेती करत बसावं असे वाटतंय" अशी पोस्ट देखील वसंत मोरे यांनी फेसबुकवर केली आहे. त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Maharashtra Politics MNS MLA Raju Patil Make Leader of Opposition in Legislative Assembly Vasant More shocking demands
Maharashtra Politics: अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी गेले नाहीत; लवकरच... सामनातून खळबळजनक दावा

राज ठाकरे यांनी बोलावली तातडीची बैठक

दरम्यान, राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज आपल्या नेत्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. सकाळी १० वाजता दादर येथील राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहेत. अजित पवारांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.

त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत विचारमंथन होणार असल्याचे समजते. सध्या राज्याच्या विधीमंडळामध्ये राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. राज ठाकरेंनी या घडामोडींवर सोशल मीडियावरुन केलेल्या विधानांवरुन ते अजित पवारांनी शिंदे गटात जाण्याच्या निर्णयावरुन नाराज दिसत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com