G20 Summit: ६० शहरात २२० बैठका; जी २० शिखर परिषदेमुळं कशी बदलणार देशाची अर्थव्यवस्था

G20 Summit: भारतात जी२०च्या शिखर परिषदेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जगातील प्रमुख नेते आजपासून देशात येऊ लागतील.
G20 Summit
G20 SummitSaam Tv
Published On

G20 Summit:

भारतात जी२०च्या शिखर परिषदेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जगातील प्रमुख नेते आजपासून देशात येऊ लागतील. दिल्लीत होणाऱ्या G२०च्या बैठकीत चीन, अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, ब्रिटन, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, तुर्की, मेक्सिको, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन आणि अर्जेंटिना हे देश सहभागी होणार आहेत. (Latest News on G20)

दरम्यान वर्षभर ही परिषदेचे कार्यक्रम चालू होते. परंतु जी २०मुळं देशातील सामान्य लोकांना काय फायदा झाला. देशाची आर्थिक स्थिती कशी सुधारली हे जाणून घेऊ. या परिषदेच्या बैठकीसाठी येणाऱ्या इतर देशातील प्रमुख नेत्यांचं स्वागत करण्यास देशाची राजधानी सज्ज झालीय. भारताने जी २० ची अध्यक्षता घेऊन जगाच्या पातळीवर आपली आर्थिक ताकदीसह देशातील इतर ठिकाणं जगाला दाखवली.

G20 Summit
Mumbai | जी २० परिषदेच्या निमित्ताने मुंबईत रोषणाई

याच उद्देशानं जी२० शिखर परिषदेच्या साधरण २२० बैठका देशातील कानाकोपऱ्यात आयोजित केल्या गेल्या आहेत. यात देशातील २८ राज्य आणि ८ केंद्राशासित प्रदेशांच्या ६० शहरांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी२० कार्यक्रमाला भारताच्या प्रत्येक राज्याला जोडून त्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्याचबरोर जगाला भारताची विविधतेतील एकतेची संस्कृती दाखवली. त्याचप्रमाणे जेव्हा जी२०च्या माध्यमातून डिजिटल इकोनॉमीसंबंधी मंत्र्यांची बैठक बंगळुरूमध्ये झाली. त्याचप्रमाणे संस्कृती मंत्र्यांची बैठक वाराणसीमध्ये झाली होती.

यात भारतानं जगाला आपल्या देशातील सर्व राज्यांमधील संस्कृती दाखवली. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, जी२० च्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसह चर्चा झाली. त्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना जी २० च्या प्रतिनिधींशी सतत संपर्कात राहण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरुन पुढे भविष्यात अनेक नवीन संधी निर्माण होतील. मागील सहा वर्षात इंदौर हे देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून लोकप्रिय झालंय. त्या शहरात झिरो वेस्टची बैठक करण्यात आली. तेथे भारतानं स्वच्छ भारताचा उपक्रम झलक दाखवली.

G20 Summit
Pune Heritage Walk: लाल महल ते शनिवारवाडा; जी-२० च्या परदेशी पाहुण्यांसाठी ‘हेरिटेज वॉक’

पंतप्रधान मोदींनी पुढे मुलाखतीत सांगितलं की, जी २० शिखर परिषदेचे कार्यक्रम विविध शहरात झाल्याने साधारण १.५ कोटी लोकांना याचा फायदा झालाय. हे लोक कोण-कोणत्या कामातून या कार्यक्रमाशी जोडल्या गेले होते. दरम्यान अशा मोठ्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानं आपला आत्मविश्वास वाढत असतो. त्याचबरोबर या बैठकांसाठी १२५ देशातील प्रतिनिधी भारतात आले होते.

एक लाखापेक्षा अधिक लोकांनी भारताच्या विविध भागांना पाहिलं. याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला. ज्या राज्यांमध्ये इतर देशातील प्रतिनिधी गेले होते, त्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाला होता. यासर्व गोष्टींमुळे भारतीय पर्यटन विभागालासाठी फायदेशीर ठरणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com