PM Modi and Donald Trump saam tv
देश विदेश

मोदी-ट्रम्प १६ महिन्यांनंतर आमनेसामने! फ्रान्समध्ये होणार द्विपक्षीय बैठक; 'या' मुद्द्यांवर होणार खडाजंगी?

Narendra Modi, Donald Trump Latest Marathi News : जी-७ शिखर परिषदेदरम्यान फ्रान्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची १६ महिन्यांनंतर प्रत्यक्ष भेट होणार आहे.

Namdeo Kumbhar

Modi Trump meeting at G7 Summit France : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ शिखर परिषदेसाठी ६ दिवसांच्या विदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात फ्रान्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांच्या व्यापार करारावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यात ट्रेड डीलवरून तणाव आहे. यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमेरिकन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १६-१७ जून रोजी एव्हियन येथे होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेच्या निमित्ताने फ्रान्समध्ये द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये पंतप्रधान मोदींनी वॉशिंग्टनला भेट दिल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली होती. त्यानंतर ही त्यांची पहिलीच समोरासमोरची भेट असेल.

अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रम्प हे फ्रान्स, इजिप्त आणि भारतासह शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. पंतप्रधान मोदी हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून १६-१७ जून रोजी होणाऱ्या जी ७ शिखर परिषदेत पाहुणे म्हणून सहभागी होण्यासाठी फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत.

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातील ही अपेक्षित बैठक भारत-अमेरिका संबंधांमधील एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर होणार आहे. कारण मागील काही दिवसांपासून अमेरिका-भारत या दोन्ही देशात व्यापार करारावरून चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांच्या या भेटीमध्ये सर्व मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT