India Pakistan Ceasefire X
देश विदेश

India Pakistan यांच्यामध्ये लागू झालेला Ceasefire म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या...

India Pakistan Ceasefire : भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या संबंधित ट्वीट केले. त्यानंतर दोन्ही देशांकडून या माहितीला दुजोरा देण्यात आला.

Yash Shirke

भारत-पाकिस्तान संघर्ष वाढत असताना दोन्ही देशांनी तात्काळ युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत दीर्घ चर्चा केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी हा निर्णय घेतल्याचे ट्वीट ट्रम्प यांनी केले. या निर्णयामुळे ट्रम्प यांनी दोन्ही देशांचे अभिनंदन केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये Ceasefire म्हणजेच शस्त्रसंधी झाल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली म्हणजे नेमकं काय झालं?

भारत पाकिस्तान यांच्यात शस्रसंधी झाली याचा अर्थ भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपापसातील सैनिकी कारवाया तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. शस्त्रसंधीदरम्यान ठराविक गोष्टी दोन्ही देशांकडून मान्य केल्या जातात. उदाहरणार्थ -

१. सीमेवर गोळीबार, बॉम्बहल्ले किंवा इतर कोणत्याही शस्त्रसज्ज कारवाया बंद करणे.

२. युद्ध होईल, दोन्ही देशांमधील संघर्ष वाढले अशी कोणतीही कृती न करणे.

३. दोन्ही देशांशी संबंधित प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवणे. शांततेचे वातावरण तयार करणे.

शस्त्रसंधी म्हणजे दोन देशांमधील एक तात्पुरती किंवा कायमस्वरूपी करार असतो, ज्याद्वारे एकमेकांवर पाणी, हवा आणि जमीन या तिन्ही माध्यमांवर गोळीबार, हल्ले किंवा लढाई थांबवण्याचे ठरवले जाते. युद्ध होऊ नये यासाठी शस्रसंधी हा मार्ग निवडला जातो. जे देश युद्धामध्ये सामील होतात, त्यांना युद्धाचे परिणाम भोगावे लागतात. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधी झाली आहे असे म्हटले जात आहे.

ज्या देशाने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, त्या देशाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेल्या देशावर संयुक्त राष्ट्रांसह अमेरिका, चीन, रशिया या देशांकडून दबाब येतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी झाल्याने त्या देशाला वेळीच माघार घ्यावी लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT