India Alliance Meeting Saam Tv
देश विदेश

India Alliance Meeting: 1 जूनला इंडिया आघाडीची बैठक, TMC राहणार गैरहजर; काय आहे कारण?

Mamata Banerjee News: येत्या 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याच दिवशी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. मात्र टीएमसी या बैठकीला गैरहजर राहणार आहे.

Satish Kengar

तृणमूल काँग्रेस 1 जून रोजी होणाऱ्या नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्सच्या (इंडिया आघाडी) बैठकीला गैरहजर राहणार आहे, अशी बातमी समोर येत आहे. बैठकीच्या दिवशीच लोकसभा निवडणुकीच्या सातव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे टीएमसी पक्षाचे प्रमुख नेते व्यस्त असल्याने, ते बैठकीला हजर राहू शकणार नाही, असं सांगितलं जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 1 जून रोजी दुपारी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. टीएमसीच्या सूत्रांनी सांगितले की, बैठकीच्या दिवशी पक्षासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोलकाता (कोलकाता दक्षिण आणि कोलकाता उत्तर) मधील 2 जागांसह पश्चिम बंगालमधील 9 जागांवर मतदान होणार आहे.

टीएमसीच्या सूत्रांनी सांगितले की, त्या दिवशी मतदान होणार असलेल्या राज्यातील इतर मतदारसंघांमध्ये जाधवपूर, दमदम, बारासत, बशीरहाट, जयनगर, मथुरापूर आणि डायमंड हार्बर यांचा समावेश आहे. टीएमसी पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि इतर प्रमुख नेते त्या दिवशी मतदान करतील आणि त्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. इंडिया आघाडीच्या आतापर्यंतच्या सर्व बैठकांना पक्षाने हजेरी लावल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी 23 जून रोजी पाटणा येथे इंडिया आघाडीची पहिली बैठक झाली होती. यानंतर 17-18 जुलै 2023 रोजी बेंगळुरू येथे आणि नंतर 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान मुंबईत बैठक झाली. इंडिया आघाडीची चौथी बैठक 19 डिसेंबर रोजी दिल्लीत झाली.

यानंतर अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या निषेधार्थ 31 मार्च रोजी दिल्लीत आयोजित 'लोकशाही वाचवा' सभेत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला. टीएमसी या सर्व सभा आणि जाहीर सभांचा भाग राहिली आहे. दिल्लीतील 31 मार्चच्या रॅलीत, टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांनी घोषणा केली होती की, ते इंडिया आघाडीचा एक भाग राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT