Akola News: 60 वर्षे सोबत जगले अन् जगाचा निरोपही सोबतच घेतला; पतीच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू; एकाचवेळी अंत्यसंस्कार

Akola Old Couple Love Story: अकोल्यात एक दुःखद घटना घडली आहे. येथे पतीच्या मृत्यूच्या काही तासांतच पत्नीनेही आपले प्राण सोडले आहे. आयुष्याची 60 वर्ष सोबत घालवल्यानंतर जगाचा निरोपही यांनी एकसोबत घेतला आहे.
60 वर्षे सोबत जगले अन् जगाचा निरोपही सोबतच घेतला; पतीच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू; एकाचवेळी अंत्यसंस्कार
Akola NewsSaam Tv

अक्षय गवळी, साम टीव्ही, अकोला प्रतिनिधी

विदर्भातल्या अकोल्यात 60 वर्ष वैवाहिक जीवन आनंदात घालवल्यानंतर 82 वर्षीय रमेशसिंग आणि 76 वर्षांच्या पदमाबाई या वयस्कर दाम्पत्यानं एकाच दिवशी या जगाचा निराेप घेतलाय. या दोघांच्या मृत्यूमध्ये 8 तासांचा फरक होता. दरम्यान, दोघांचेही भेट साधारणता 60 वर्षांपूर्वी रमेशसिंग हे लग्नासाठी मुलगी पाहायला गेले असता झाली, त्यावेळी ते 22 वर्षांचे, तर पदमाबाई अंदाजे 16 वर्षांच्या हाेत्या.

कुटुंबातील वरिष्ठांनी दाेघांचे लग्न लावलं. लग्नानंतर पदमाबईंनी पतीसाेबत अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात अख्खं आयुष्य घालवलेय. 60 वर्षापेक्षा दीर्घकाळ एकमेकांसाेबत राहून दाेघांचं काल मध्यरात्री निधन झाले. आज (27 मे रोजी) सोमवारी दुपारी राहत्या बाळापूरात दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

60 वर्षे सोबत जगले अन् जगाचा निरोपही सोबतच घेतला; पतीच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू; एकाचवेळी अंत्यसंस्कार
Mumbai Police Threat Call: ताज हॉटेल, मुंबई विमानतळसह इतर ठिकाणी बॉम्ब ठेवलाय; पोलीस कंट्रोल रुमला धमकीचा फोन

अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील गुजराती पूरा भागात ही घटना घडली आहे. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या 8 तासानंतर पत्नीचाही मृत्यू झाला. लग्नानंतर 60 वर्षे एकत्र आयुष्याचा प्रवास केल्यानंतर दोघांनी काही अंतरातच जगाचा निरोप घेतला. रमेशसिंग करणसिंग गौतम (वय 82) आणि पदमाबाई रमेश गौतम (वय 72) यांचा 60 वर्षापूर्वी विवाह झाला होता.

पदमाबाई यांचे माहेर धुळे जिल्ह्यातील असून, रमेशसिंग हे मूळचे अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. वरिष्ठांच्या ऐकमतांनी दोघांचा विवाह पार पडला होता. दोघांनाही लग्नानंतर दोन मुल आणि दोन मुली आहेत. मुला मुलींचे लग्न होऊन नातवंड झाली. दोघांनी 60 वर्ष सोबत प्रवास केल्यानंतर काल मध्यरात्री त्यांनी अखेरचा जगाचा निरोप घेतला. पती रमेशसिंग यांचा दीर्घ आजाराने काल रात्री 7 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. तर पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नी पदमाबाई यांचा देखील आज पहाटे मृत्यू झाला. पती-पत्नीच्या निधनामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान, दोघांनीही आयुष्याचा बराच काळ एकत्र घालवला. पतीचा मृत्यूचा धक्का पदमाबाईंना सहन झाला नाही.

60 वर्षे सोबत जगले अन् जगाचा निरोपही सोबतच घेतला; पतीच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू; एकाचवेळी अंत्यसंस्कार
Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्ना यांनी आई-वडिलांची मागितली माफी; 31 मे रोजी SIT समोर हजर राहणार, स्वतःच दिली माहिती

आज दुपारी राहत्या घरापासून वाजत गाजत पती-पत्नीची अंत्ययात्रा काढण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येनं नातेवाईक आणि स्थानिक लोक सामील झाले. दोन्ही मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला आणि बाळापूरच्या स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कुटुंबियांनी सांगितलं की, दोघांमध्ये खूप प्रेम होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com