Heat Wave : अकोला जिल्ह्यात ३१ मे पर्यंत जमावबंदीचा आदेश; मोठं कारण आलं समोर

Akola Heat Wave : अकोला जिल्ह्यात २५ ते ३१ मे पर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. उष्माघाचा धोका लक्षात घेता अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यात ३१ मे' पर्यंत कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू केली आहे.
Heat Wave
Heat Wave Saam Digital
Published On

अकोला जिल्ह्यात २५ ते ३१ मे पर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. उष्माघाचा धोका लक्षात घेता अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यात ३१ मे' पर्यंत कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू केली आहे. दरम्यान आज अकोल्यात ४५.०६ अंश एवढं तापमान नोंदवण्यात आलंय.त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालं आहे.

जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४४ ते ४५.८ अंश सेल्सियसपर्यंत आहे. उष्माघातामुळे सामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी कामगारांना सेवा पुरवणे, खासगी क्लासेसच्या वेळेत बदल करणे व अन्य उपाय योजना प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्याचे जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे २५ मे दुपारी ४ पासून ते ३१ मेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याच म्हटलं आहे.

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही. कामाच्या ठिकाणी उष्माघातापासून संरक्षासाठी पुरेसे शेड तयार करणे, पंखे, कुलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था, पिण्याचे पुरेसे पाणी व प्रथमोमपचार पेटी ठेवणे, याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकाची राहणार आहे.

Heat Wave
Heat Wave : भंडारा जिल्हात पारा 43 अंशांवर; घराबाहेर पडणंही झालं मुश्किल

याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित ग्राम पंचारयत, महानगरपालिका, नगर परिषद, पोलीस प्रशासन, कामगार कल्याण विभागाकडे तक्रार करता येईल. खासगी शिकवणी वर्गाच्या संचालकांनी सकाळी १० पर्यंत व सायंकाळी ५ नंतर कोचिंग सेंटर चालवावेत. सकाळी १० ते ५ वेळेत क्लास सुरू ठेवले तर पंख, कुलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था करण्याची जाबबदारी संबंधित क्लासच्या संचालकांची राहणार आहे, असंही आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Heat Wave
Raju Shetti : राज्य सरकार नेबळटपणा दाखवतंय; कर्नाटकातील लोकांच्या पाणी चोरीवरून राजू शेट्टी आक्रमक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com