Heat Wave : भंडारा जिल्हात पारा 43 अंशांवर; घराबाहेर पडणंही झालं मुश्किल

Bhandara Heat Wave : भंडारा जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलेला असून उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सूर्य आग ओकत असून आज भंडारा जिल्ह्यात तापमान 43 अंश सेल्सिअस वर पोहोचलं आहे.
Heat Wave
Heat WaveSaam Digital

भंडारा जिल्ह्यात तापमानाच्या पारा वाढलेला असून तापमान कमी व्हायला तयार नाही. उकाडा वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सूर्य आग ओकत असून आज भंडारा जिल्ह्यात तापमान 43 अंश सेल्सिअस वर पोहोचलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असल्यामुळे घराबाहेर पडणंही मुष्कील झालं आहे.

जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी वर्गावर याचा परिणाम जाणवत आहे. सकाळच्या सुमारापासून मजूर वर्ग तसेच शहरातील नागरिक सुद्धा सर्व कामे आटोपून घेण्यावर भर दिला जात दुपारी घरी विश्रांती घेत आहेत. त्यामुळे रस्त्यावर सुद्धा सुखसुकाट पाहायला मिळत आहे. खूप महत्त्वाचं काम असेल तरचं नागरिक हे घराबाहेर पडत आहेत. उष्णतेमुळे बचाव करण्यासाठी नागरिक थंड पेय सेवन करताना दिसत आहेत.

यवतमाळ जिल्ह्याचे तापमान 45.5 अंशांवर

नवतपाच्या पहिल्याच दिवशी पारा भडकला असून शनिवारी 45.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तापमान वाढत चालल्याने गेल्या दोन दिवसापासून नागरिकांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता यंदा अधिक जाणवत आहे. जिल्ह्यांच्या तापमानात शुक्रवारी कमालीची वाढ झाली होती, दरम्यान आज शनिवारी त्यात आणखी वाढ झाल्याचा पायाला मिळालं.

Heat Wave
Chandrabhaga River Water Pollution: चंद्रभागा नदीत मैलामिश्रित पाणी,आषाढीच्या तोंडावर वारकऱ्यांच्या जीवाला घोर Video

मार्च महिन्यात तापमानाची चाळिशी ओलांडल्याने नागरिक उष्णतेने त्रस्त झाले आहेत. मे महिन्यात तापमानाचा पारा चांगलाच भडकला आहे. दोन दिवसापासून सूर्य आग ओकत आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होत. तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. तो खरा ठरतांना दिसत आहे. सलग तीन दिवसापासून तापमान वाढत आहे.

Heat Wave
Solapur : सोलापूरमध्ये तापमानाचा पारा वाढला, वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com