हरियाणा सरकारचा मोठा प्रशासकीय फेरबदल
हरियाणा सरकारने १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या
हरियाणातील १० एचसीएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या
हरियाणा आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांनी उडाली खळबळ
हरियाणा सरकारने मंगळवारी मोठा प्रशासकीय फेरबदल केले. १६ आयएएस आणि १० हरियाणा नागरी सेवा म्हणजे एचसीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. याबाबत एक अधिकृत आदेश देखील जारी करण्यात आले आहेत. या आयएएस अधिकाऱ्यांमध्ये अनेक वरिष्ठांचा समावेश आहे. या तडकाफडकी बदलामुळे प्रशानसनात खळबळ उडाली.
अधिकृत आदेशानुसार, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजीव रंजन यांची त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त मत्स्य विभागाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त आणि सचिव तसेच अग्निशमन सेवेचे महासंचालक शेखर विद्यार्थी यांची त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त हरियाणा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. क्रीडा विभागाचे संचालक आणि विशेष सचिव, पर्यटन विभागाचे संचालक आणि विशेष सचिव तसेच हरियाणा टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ गुप्ता यांची त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त कौशल्य विकास आणि औद्योगिक प्रशिक्षण विभागाचे संचालक आणि विशेष सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जे. गणेशन यांची नागरिक संसाधन माहिती विभागाचे आयुक्त आणि सचिव, हरियाणा एआय विकास प्रकल्प आणि हरियाणाच्या शाश्वत विकासासाठी स्वच्छ हवा प्रकल्पाच्या विशेष युनिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर आणि ग्राम नियोजन विभागाचे महासंचालक आणि सचिव, आणि हरियाणा शहरी वसाहतींचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक कुमार मीना यांची शहरी स्थानिक स्वराज्य संस्था विभागाचे आयुक्त आणि सचिव आणि परकीय सहकार्य विभागाचे आयुक्त आणि सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. अमनीत पी कुमार यांची अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग तसेच क्रीडा विभाग यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्र शेखर खरे यांची हरियाणा राज्य सहकारी पुरवठा आणि विपणन महासंघ लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सर्वांसाठी गृहनिर्माण विभागाचे महासंचालक आणि सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. एचसीएस अधिकाऱ्यांमध्ये, राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाचे सचिव आणि हरियाणा व्यापारी कल्याण मंडळाचे सचिव असलेले योगेश कुमार मेहता यांची हरियाणा व्यापारी कल्याण मंडळ आणि हरियाणा राज्य अन्न आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. अतिरिक्त परिवहन आयुक्त निशू नी नम्रता सिंघल यांची प्राथमिक शिक्षण विभागात अतिरिक्त संचालक आणि हरियाणा शालेय शिक्षण प्रकल्प परिषदेच्या अतिरिक्त राज्य प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.