

उत्तराखंडच्या चमोलीमध्ये बोगद्यात पाणी आणि मातीचा ढिगारा शिरला
चमोलीच्या मायापूर पिंपळकोटी येथे बोगदा दुर्घटना
बोगद्यात सुमारे २० कामगार अडकल्याची प्राथमिक माहिती
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात मायापूर (पिंपळकोटी) येथे THDC द्वारे बांधल्या जाणाऱ्या एका बोगद्यात मोठी दुर्घटना घडलीय. मातीचा ढिगारा आणि पाणी शिरल्याने बोगद्यात सुमारे २० कामगार आत अडकले. ही घटना सायंकाळी ७:०५ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आलीय. रात्री ८:३० वाजेपर्यंत १६ कामगारांची सुरक्षित सुटका करण्यात आली होती, तर उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्याचे आणि त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. बोगदा बांधण्याचे काम HCC कंपनीकडून केले जात आहे.
जखमींना उपचारासाठी गोपेश्वर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलंय. आत अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ (SDRF), एनडीआरएफ (NDRF), आयटीबीपी (ITBP), लष्कर आणि इतर संबंधित यंत्रणांची पथके घटनास्थळी उपस्थित आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी गौरव कुमार यांनी घटनास्थळी स्वतः उपस्थित आहेत. मदत व बचाव कार्यावर ते लक्ष ठेवून आहेत. बोगद्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली जात आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सुद्धा या घटनेने दु:खी झालेत. मुख्यमंत्र्यांनी तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आली माहिती दिलीय. सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये धामी यांनी सांगितले की, "पिपालकोटी येथील टीएचडीसी (THDC) बोगद्यात मलबा आणि पाणी शिरल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता एनडीआरएफ (NDRF) आणि उत्तराखंड एसडीआरएफ (SDRF) ची पथके त्वरित घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणांना युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य राबविण्याचे निर्देश देण्यात आलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.