हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rakesh Mehta, Former Delhi Chief Secretary : दिल्लीचे माजी मुख्य सचिव आणि ज्येष्ठ आयएएस अधिकारी राकेश मेहता यांचा नोएडातील राहत्या घरात मृतदेह आढळला. घटनास्थळी चिठ्ठी सापडली असून पोलीस तपास सुरू आहे.
Rakesh Mehta, Former Delhi Chief Secretary
Rakesh Mehta, Former Delhi Chief SecretarySaam TV
Published On

दिल्लीचे माजी मुख्य सचिव आणि १९७५ च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी राकेश मेहता (वय ७४) यांचे नोएडा येथील राहत्या घरात निधन झाले. नोएडामधील सेक्टर-८२ येथील केंद्रीय विहार-२ सोसायटीतील एका बंद फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली आहे. त्यांनी आजारपण आणि मानसिक तणावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश मेहता हे गेल्या काही वर्षांपासून नोएडामधील या फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. त्यांची पत्नी (माजी आयएएस अधिकारी) आणि मुलगा देहराडून येथे राहतात. शनिवारी रात्री राकेश मेहता यांचे त्यांच्या पत्नीशी फोनवर बोलणे झाले होते. पण रविवारी दुपारी कौटुंबिक नातेवाईकांनी आणि पत्नीने वारंवार फोन करूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

संशय आल्याने पत्नीने सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना फ्लॅटवर जाऊन पाहण्यास सांगितले. सुरक्षारक्षक जेव्हा फ्लॅटवर पोहोचले, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर पोलिसांना 'डायल-११२' वरून माहिती देण्यात आली.

Rakesh Mehta, Former Delhi Chief Secretary
Today's Horoscope : गणपती बाप्पाच्या कृपेने 'या' राशींची लॉटरी, तर काहींच्या नशिबात संकटांचा डोंगर; पाहा आजचे राशीभविष्य

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने पाहणी केली. पोलिसांना तेथे इंग्रजीत लिहिलेली एक पानाची चिठ्ठी (सुसाइड नोट) सापडली आहे. या चिठ्ठीत त्यांनी आपल्या या निर्णयासाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही. दीर्घकाळापासून असलेले आजारपण आणि मानसिक तणावाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Rakesh Mehta, Former Delhi Chief Secretary
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० 'या' दिवशी जमा होणार? फडणवीस सरकार आज घेणार मोठा निर्णय

प्रशासकीय सेवेतील योगदान

राकेश मेहता हे दिल्ली प्रशासनातील अत्यंत प्रभावी आणि अभ्यासू अधिकारी मानले जात होते. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात २००७ ते २०१० या कालावधीत दिल्लीचे मुख्य सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली होती. २०१० च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्सच्या यशस्वी आयोजनात त्यांची मुख्य प्रशासक म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. दिल्लीतील वाहतूक सुधारणा, लो-फ्लोर बस सेवा सुरू करणे, वीज क्षेत्राचे खाजगीकरण आणि दिल्ली महापालिकेचे (MCD) आयुक्त म्हणूनही त्यांनी अनेक मोठे सुधारणात्मक निर्णय घेतले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com