आंबा प्रेमींसाठी खूशखबर, पुण्याच्या बाजारात आंबा हंगामाचा शुभारंभ, पेटीला 41 हजारांचा भाव

Alphonso Mango, Pune Market Yard : आंबाप्रेमींसाठी खूशखबर! पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डात हापूस आंब्याच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर रत्नागिरी आणि देवगडच्या हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीची तब्बल ४१ हजार रुपयांना विक्री झाली.
Alphonso Mango, Pune Market Yard
Alphonso Mango, Pune Market Yard
Published On: 

आता आंबाप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी... लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर आंब्याची पहिली पेटी बाजारात दाखल झालीये. तर आंब्याला चांगला भाव मिळाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आंबा प्रेमींसाठी ही खुशखबर असली तरी व्यापाऱ्यांनी मात्र नवा अंदाज वर्तवलाय... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं लक्ष्मी पावलीये. पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डात हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झालीये... पुण्यातील मार्केटयार्ड मधून हापूस आंब्याच्या पेटीसाठी 15 हजारांवरून सुरू झालेली बोली 40 हजारांपर्यंत पोहोचली... मात्र, अंतिम बोलीमध्ये रत्नागिरी आणि देवगडहून आलेल्या आंब्याच्या पहिल्या पेटीची तब्बल 41 हजारांना विक्री झाली... पहिल्या पेटीसह इतर पेट्यांचाही लिलाव उत्साहात पार पडला असला तरी मात्र, यंदा दुष्काळामुळे फळाची आवक कमी होण्याची शक्यता व्यावसायिकांनी न चुकता वर्तवलीये...

Alphonso Mango, Pune Market Yard
दिवाळीच्या सणावर काळाचा घाला! धाराशिवमध्ये भीषण आगीत संपूर्ण कुटुंब जळून खाक, ६ जणांचा होरपळून मृत्यू

खरंतर, एरवी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात बाजारात येणारा हापूस यंदा नोव्हेंबरच्या सुरवातीलाच बाजारात दाखल झाल्याने सर्वांच्याच नजरा मार्केट यार्डातील बोलीकडे लागल्या होत्या. मात्र, बाजारात पहिली पेटी दाखल झाली आणि पहिल्याचं पेटीनं भाव खाल्ला. लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर आंब्याच्या फळाची विक्री आणि त्यातून होणारी व्यवसायाची वृद्धी पाहता आंबा व्यावसायिक आनंदानं बहरलाय. तर दुसरीकडे, यंदा वातावरणातील बदलांमुळे आंबा लवकर तयार झाला असला, तरी हवामानाच्या लहरीपणाचा फटका उत्पादनाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदा आवक मर्यादित राहून भाव चढेच राहतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र, असं असलं तरी लिलावानंतर सर्वसामान्यांना आंबा प्रेमींना किती दरानं मिळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय...

अक्षय बडवे, साम टिव्ही, पुणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.