Ahmedabad Plane Crash Saam Tv
देश विदेश

Air India Plane Crash: वाटलं नव्हतं की ते विमान पडेल, अपघाताचा VIDEO मोबाइलमध्ये रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने सांगितला थरार

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामध्ये २७५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमान कोसळतानाचा व्हिडीओ ज्या तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला त्याने अपघाताचा थरार सांगितला...

Priya More

अहमदाबादमध्ये गुरूवारी झालेल्या विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेचा व्हिडीओ एका विद्यार्थ्याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते की ऐवढं वेगाने सगळं घडलं तर मग हा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड कसा केला गेला. आता नेटकऱ्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तर स्वत: या तरुणानेच दिले आहेत. आर्यन नावाच्या तरुणाने हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता.

अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा आर्यन त्याच्या गावाहून अहमदाबादला आला होता. अहमदाबादमध्ये पोहोचल्यावर त्याला दिसले की त्याच्या घराजवळच विमानतळ आहे. हे पाहून आर्यनला खूपच उत्सुकता वाटली. विमानतळावरून सतत विमाने येत-जात होती. ही दृश्ये पाहून आर्यनने विमानांचे व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याचे ठरवले.

आर्यनची इच्छा होती की विमानांचे उड्डाण करतानाचे व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून गावी गेल्यानंतर आपल्या मित्रांना दाखवेल. आर्यन मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत होता. त्याचवेळी एअर इंडियाच बोईंग-७८७ विमानाने उड्डाण केले. जेव्हा या विमानाने सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण करण्यास सुरूवात केली तेव्हा आर्यनने व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमान खाली आले आणि एका इमारतीवर जाऊन आदळले. हा अपघात इतका भयानक होता की आगीच्या ज्वाळा शेकडो फूटांवर येत होत्या. परिसर धुराने व्यापले होते.

आर्यनने सांगितले की, जेव्हा तो व्हिडिओ रेकॉर्ड करत होता तेव्हा त्याला माहिती नव्हते की विमान कोसळेल आणि २७५ जणांचा मृत्यू होईल. तो फक्त त्याच्या मित्रांना दाखवण्यासाठी विमानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. पण ही ऐवढी मोठी दुर्घटना घडेल असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं. दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शी महिने सांगितले की, जेव्हा विमानाने उड्डाण घेतलं तेव्हा ते अपघात झाले तेव्हा असे वाटत होते की पायलटचे नियंत्रण सुटले आहे आणि बघता बघता हे विमान कोसळले. या घटनेनंतर आगीचा भडका उडाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT