Operation Sindoor Saam
देश विदेश

Operation Sindoor: 25 मिनिटं, ९ ठिकाणं, ७० दहशतवादी यमसदनी, भारताने operation Sindoor कसं यशस्वी केलं? वाचा

Operation Sindoor: भारताच्या हवाई दलाने मध्यरात्री 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून नियोजनबद्ध, अचूक हल्ले करत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. या कारवाईत ९ दहशतवादी तळ नष्ट केले आणि ७० दहशतवादी मारले गेले.

Namdeo Kumbhar

भारताच्या हवाई दलाने मध्यरात्री 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून नियोजनबद्ध, अचूक हल्ले करत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. या कारवाईत ९ दहशतवादी तळ नष्ट केले आणि ७० दहशतवादी मारले गेले. भारतीय हवाई दलाने २५ मिनिटात ९ ठिकाणी मिसाईल डागल्या. रात्री एक वाजून ५ मिनिटांनी भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये एन्ट्री केली. रात्री १.३० पर्यंत भारताने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन केले. Lashkar-e-Taiba (LeT), Jaish-e-Mohammed (JeM) आणि Hizbul Mujahideen यासऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. जाणून घेऊयात सविस्तर.

२२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये अंदाधुंद गोळीबार केला. २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमावावा लागला होता. यामध्ये २५ भारतीयांचा समावेश होता. पहलगाम येथील भ्याड हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत बलदा घेतला, पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारले. आज दुपारी राजधानी दिल्लीमध्ये भारतीय लष्कराकडून ऑपरेशन सिंदूरबाबत पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती दिली...

भारतीय वायुसेना, नौदल आणि लष्कराने एकत्रितपणे ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. राफेल विमानांनी स्काल्प आणि हॅमर मिसाईल्सचा वापर करत पाकिस्तानात ४ ठिकाणी आणि पीओकेमध्ये ५ ठिकाणी हल्ला केला. हे हल्ले भारतीय हद्दीतूनच करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना टार्गेट केले नाही. हा सर्जिकल स्ट्राईक योग्य वेळ, मर्यादित, अचूक आणि गैर-आक्रमक असल्याचे सांगितले. या हलल्यांचे नियोजन, गुप्तचर माहिती, सॅटेलाइट फोटो आणि संनाद यंत्रणेवर आधारित होते.

कोण कोणत्या ठिकाणावर हल्ला -

भारतीय लष्कराने ९ तळांवर २५ मिनिटात हल्ला केला. बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय, मार्कझ सुभान अल्लाह, मुरिदके येथील लष्कर-ए-तय्यबाचा मार्कझ तैबा, सियालकोट येथील मेहमूना जिया (हिजबुल मुजाहिदीन), तेहरा कलन येथील सर्जल (जैश), कोटली येथील मार्कझ अब्बास आणि मस्कर रहील शाहिद, मुजफ्फराबाद येथील शवई नाला आणि सय्यदना बिलाल तळ, तसेच बरनाला येथील मार्कझ अहले हदीस यांचा समावेश होता.

पाकड्यांचे खोटे दावे -

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने पुंछ आणि राजौरीत गावांवर गोळीबार केला. त्यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला, तर ४४ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने नीलम-झेलम प्रकल्प आणि नागरी ठिकाणांवर हल्ले झाल्याचा खोटा दावा केला. पाकिस्तानचा दावा भारताच्या PIB फॅक्टचेकने खोडून काढला. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ आणि पीओकेतील रहिवाशांनी शेअर केलेल्या फुटेजमुळे पाकिस्तानच्या क्रूरतेचा पुरावा समोर आला.

भारताने अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, यूएई आणि रशियाला ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माहिती दिली. दहशतवाद्यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पाठिंबा मिळालाय. दोन्ही देशांनी शांतता बाळगावी, असे आवाहन यूएनकडून करण्यात आलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रभर ऑपरेशन सिंदूरचे निरीक्षण केले, तर NSA अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या NSA मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT