Uttar Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीची रिक्षाला धडक; ६ महिलांचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशमध्ये भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीने रिक्षाला धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षाचा चुराडा झाला. रिक्षातील ६ महिलांचा मृत्यू तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Priya More
  • उत्तर प्रदेशध्ये भीषण अपघाताची घटना घडली

  • भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीने ई-रिक्षाला धडक दिली

  • अपघातामध्ये ६ महिलांचा जागीच मृत्यू झाला

  • या अपघातामध्ये ३ जण गंभीर जखमी झालेत

उत्तर प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ६ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण लग्नसमारंभासाठी तांदूळ मागण्यासाठी जात असताना ही घटना घडली. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी उझानी येथील बरेली-मथुरा महामार्गावर जुनुइया गावातील करुआ पुलाजवळ हा अपघात झाला. भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीने ई-रिक्षाला धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरवन नगला येथील ९ जण घरोघरी जाऊन तांदूळ मागण्यासाठी कोतवाली भागातील गरहौना गावाकडे ई-रिक्षाने जात होते. करुआ पुलाजवळ समोरून येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रॅक्टर-ट्रॉलीने ई-रिक्षाला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षातील ६ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले. या अपघातात ई-रिक्षाचा चुराडा झाला. काही मृतदेहांचे अक्षरश: तुकडे झाले.

या अपघातामध्ये प्रेमा, गंगाश्री, राजकुमारी, रेवती, नारायणी आणि कासगंज येथील गुलाबगढ़ी येथील रहिवासी नारायणी देवी यांचा मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये २ महिला आणि रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. तिघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाही महिलांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी सांगितले की, मुरवन नगला येथील रहिवासी दलचंद मौर्य यांचा मुलगा कुंवरपाल याचे लग्न २९ जून रोजी होणार होते. लग्नसमारंभाचा एक भाग म्हणून नातेवाईक तांदूळ मागण्यासाठी गरहौना येथे जात होते. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोगर कोसळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT