भाजप मंत्र्याच्या पुतण्याचा चिनी मांजामुळे गळा कापला
मंत्री संजय गंगवार यांचा पुतण्या गंभीर जखमी
मंत्री गंगवार यांच्याकडून कारवाईचे आदेश
उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात बंदी घातलेल्या चिनी मांजामुळे भयंकर घटना घडली आहे. बरेलीतील श्यामगंज उड्डाणपुलावर सोमवारी भयानक घटना घडली. दुचाकीने जाताना भाजप मंत्र्याच्या १५ वर्षीय पुतण्याचा चिनी मांजामुळे गळा कापला. या घटनेत मंत्री संजय गंगवार यांचा पुतण्या गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुतण्या आदित्य वीर सिंह हा सोमवारी दुचाकीने स्टेडियमवर निघाला होता. श्यामगंज उड्डाणपूल आल्यानंतर हवेतील चिनी मांजा गळ्यात अडकला. गळ्यात अडकल्यानंतरही त्याचा दुचाकी सुरू होती. त्यामुळे आदित्य वीर सिंहने दुचाकीवरून नियंत्रण गमावून रस्त्यावर पडला. त्यानंतर आदित्य रस्तावर पडून गंभीर जखमी झाला.
अपघातस्थळी लोकांनी तातडीने आदित्यला रुग्णालयात दाखल केले. तसेच त्याच्या कुटुंबीयाला माहिती दिली. बाजारात चिनी मांजावर बंदी आहे, त्यानंतरही बाजारात चिनी मांजा उपलब्ध होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच भाजप मंत्री संजय गंगवार हे पीलीभीत येथून बरेली येथे पोहोचले. त्यांनी आदित्यची विचारपूस केल्यानंतर त्याच्यार उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेतली.
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री संजय गंगवार यांनी दु:ख व्यक्त करत म्हटलं की, 'सरकारकडून चिनी मांजावर बंदी आहे. त्यानंतरही दुर्घटना घडत आहेत, याविषयी चिंता वाटत आहे. त्यांनी या दुर्घटनेवरून प्रशासनाला जाब विचारला आहे. बंदी घातलेल्या चिनी मांजाची विक्री होऊ लागल्याने मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणातील जबाबदार लोकांवर कारवाई गरजेची असल्याचे त्यांनी म्हटलं.
पोलीस अधिकारी अनुराग आर्य यांनी म्हटलं की, चिनी मांजाविरोधात अभियान राबवले जात आहेत. या घटनेनंतर हे अभियान अधिक गतीने राबवले जाईल. बंदी घातलेल्या चिनी मांजा विकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.