Hong Kong fire updates  Saam TV Marathi News
देश विदेश

Hong Kong Fire : हाँगकाँगमध्ये अग्नितांडव, ७ अपार्टमेंटचा भीषण आगीत कोळसा, ४४ जणांचा होरपळून मृत्यू, २७९ जण बेपत्ता

Hong Kong fire updates Death Toll Rise : हाँगकाँगमधील ताई पो येथे लागलेल्या भीषण आगीत वांग फुक कोर्टच्या ७ गगनचुंबी इमारती कोळसा झाल्या आहेत. या दुर्घटनेत ४४ जणांचा मृत्यू तर २७९ जण बेपत्ता आहेत. ८ टॉवरमधील आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

  • हाँगकाँगमध्ये भीषण आग लागून ७ इमारती कोळसा झाल्या.

  • आगीत ४४ जणांचा मृत्यू झाला असून २७९ जण अद्याप बेपत्ता आहेत.

  • २००० फ्लॅट्स असलेल्या या सोसायटीमध्ये बांबूचे मचाण आणि पॉलीस्टीरिन बोर्डमुळे आग वेगाने पसरल्याचा अंदाज आहे.

  • आग नियंत्रणात आणण्यासाठी ७०० पेक्षा जास्त जवान प्रयत्नशील असून काही इमारतींमध्ये अजूनही धूर दिसत आहे.

Massive Fire in Hong Kong Destroys 7 Towers; 44 Dead, 279 Missing : ७ अपार्टमेंट, २००० फ्लॅट्स असेलली सोसायटी भीषण आगीमुळे एका क्षणात कोळसा झाली. हाँगकाँगमध्ये लागलेल्या या भयंकर आगीमध्ये ४४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ४५ जणांची प्रकृती गंभीर आहे. धक्कादायक म्हणजे, २७९ जण अद्याप बेपत्ता आहेत. मृतांमध्ये एका अग्निशमन दलाचाही समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं वृत्त रॉयटर्सने वृत्त दिले आहे.

हाँगकाँगमधील ताई पो येथे अलिशान अन् गगनचुंबी इमारतीला स्थानिक वेळेनुसार, रात्री ८ वाजता आग लागली. या आगीने पाहता पाहता रौद्र रूप घेतले अन् क्षणात ७ इमारतीचा कोळसा झाला. आगीवर मात मिळवण्यासाठी एकाच वेळी ७०० पेक्षा जास्त अग्निशामन दलाचे जवान कार्यकरत होते. इमारतीला लागलेल्या आगीनंतरचे दृश्य मन सुन्न करणारे होते. इमारतमधून आगी आणि ‍काळाकुट्ट धूर येत होता. अग्निशामन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

हाँगकाँगमधील वांग फुक कोर्ट नावाच्या सोसायटीमध्ये आग लागली होती. या सोसायटीमध्ये ८ गगनचुंबी इमारती असून त्यामध्ये २००० फ्लॅट्स आहेत. या भीषण आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग कशामुळे लागली, याचा तपास केला जात आहे. प्राथमिक कारणांनुसार, रीडेव्हलमेंट सुरू असलेल्या ठिकाणी खिडक्या बंद करणारे पॉलीस्टीरिन बोर्ड आढळले आहेत. यामुळे आग अतिशय वेगाने पसरल्याचा अंदाज वर्तवला जातोय. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, बांबूच्या मचानांमुळे आग बाजूच्या इमारतीमध्येही वेगाने पसरत गेली अन् एकाच वेळी सात इमारतीमध्ये भडकली. सोसायटीमधील ८ टॉवरमध्ये भयंकर आग लागली. अग्निशामन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

आठपैकी चार इमारतीमधील आग नियंत्रणात आली आहे. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. पण काही टॉवमधून अजूनही धूर येत आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी १५ ते २० तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २००० फ्लॅट्स असणारी सोसायटी क्षणात कोळसा झाल्यामुळे शेकडो संसार उघड्यावर पडले आहेत. सरकारकडून तात्काळ मदत केली जात आहे. शेकडो रहिवाशांना तात्पुरत्या निवार्यांमध्ये हलवण्यात आले आहे. काही लोकांना आपत्कालीन गृहनिर्माण युनिट्स वाटप केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT