Tragic Blaze at Hong Kong Residential Complex Saam
देश विदेश

गगनचुंबी ८ इमारतींचा कोळसा; आगीत १२८ जणांचा होरपळून अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Tragic Blaze at Hong Kong Residential Complex: हाँगकाँगमधील न्यू टेरिटरीज, ताई पो येथील वांग फूक कोर्ट निवासी संकुलातील ३१ मजली टॉवरला आग. आगीत १२८ रहिवाशांचा होरपळून मृ्त्यू.

Bhagyashree Kamble

हाँगकाँगमध्ये एका गगनचुंबी निवासी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत रहिवाशांचा होरपळून मृत्यू झाला. आगीचे कारण अस्पष्ट असून, सध्या बचावकार्य सुरू आहे. द गार्डियनच्या अहवालात तज्ज्ञांनी म्हटलं की, बांबूच्या तात्पुरते बांधकामामुळे आग वेगानं पसरली. दरम्यान, या घटनेसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. बहुमजली इमारतींना लागलेल्या भीषण आगीत १२८ जणांचा मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही भीषण आग न्यू टेरिटरीजमधील ताई पो येथील वांग फुक कोर्ट निवासी संकुलात लागली आहे. या संकुलात एकूण ८ टॉवर आहेत. प्रत्येकी ३१ मजली टॉवरला भीषण आग लागली. सुमारे २हजार फ्लॅटसमध्ये एकूण ४,८०० रहिवासी राहत असल्याची माहिती समोर आली आहे. आगीत अनेक जण होरपळून जखमी झाले आहेत. ढिगाऱ्यातून आणखी मृतदेह बाहेर काढण्यात येत आहे.

पोलिसांनी या प्रकरणात प्रेस्टीज कंस्ट्रक्शनचे ३ अधिकारी, २ संचालक आणि एका अभियांत्रिकी सल्लागाराला अटक करण्यात आली आहे. प्रेस्टिज कन्स्ट्रक्शन एक वर्षाहून अधिक काळ निवासी संकुलात नूतनीकरणाचे काम करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, नुतनीकरणामुळे इमारती या संरक्षक जाळ्या तसेच प्लास्टिकनं वेढलेल्या होत्या. एका इमारतीवरील खिडक्या बांधकाम कंपनीने दुरूस्तीचे काम करताना फोमने सील केल्याचं त्यांना आढळले.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वेबसाईटनुसार, इमारतींमधील हॉलवे तसेच स्टायरोफोम यामुळे घरांमध्ये आग वेगाने पसरण्यास कारणीभूत ठरले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीच्या कार्यालयातून कागदपत्रे, संगणक तसेच फोन जप्त करण्यात आला आहे. बुधवारी इमारतीला भीषण आग लागली. गुरूवारी सायंकाळी २४७ लोक बेपत्ता असल्याची नोंद झाली होती.

बेपत्ता लोकांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. परंतु, या प्रकरणाबाबत अधिकाऱ्यांनी अद्याप नवीन आकडा जाहीर केलेला नाही. दरम्यान, इमारतीच्या नुतनीकरणासाठी आलेले कामगार बेपत्ता असून, त्यांचा देखील शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस आणि सत्तेचा माज; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: मोदी साहेब ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसच्या काळात झालेली आहे - विजय वडेट्टीवार

Mega block News : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य-हार्बर, ट्रान्सहार्बरवर कसं असेल नियोजन, वाचा

Amsul Sar Recipe: सर्दी खोकल्यानं हैराण झालात? मग आमसूलाचा वाटीभर सार एकचा टेस्ट करून पाहाच

Health Tips: झोपण्यापूर्वी पाय धुण्याचे आश्चर्यकारक फायदे काय?

SCROLL FOR NEXT