नवलेनंतर 'या' उड्डाण पुलावर भीषण अपघात, ८-१० गाड्या एकमेकांवर आदळल्या, काचा फुटल्या अन्...

Multiple Car Collision Shocks Pune: येरवडा येथील गोल्फ क्लब उड्डाण पुलावर अपघात झाला. आठ ते दहा गाड्यानी एकमेकांना धडक दिली. या अपघातात गाड्यांचा मोठा नुकसान झालं.
Multiple Car Collision Shocks Pune
Multiple Car Collision Shocks PuneSaam
Published On
Summary
  • गोल्फ क्लब उड्डाण पुलावर भीषण अपघात

  • आठ ते दहा गाड्या एकमेकांना धडकल्या

  • वाहतूक पोलिसांनी तातडीने वाहतूक कोंडी सोडवली

पुणे नवले पुलावर झालेल्या अपघातामुळे हादरले असताना, आणखी एका अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा भीषण अपघात घडला आहे, येरवडा येथील गोल्फ कल्ब उड्डाण पुलावर. या भीषण अपघातात आठ ते दहा गाड्यांनी एकमेकांना धडक दिली. या अपघातात गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अपघात घडल्यानंतर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र, काही वेळानंतर ही अपघात कोंडी पोलिसांकडून सोडवण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात काल रात्रीच्या सुमारास घडला. पुण्यातील येरवडा परिसरात गोल्फ कल्ब उड्डाण पुलावर चारचाकींचा अपघात घडला. ८ ते १० गाड्या एकमेकांना धडकल्या. ८ ते १० गाड्या एकमेकांना धडकल्यामुळे चारचाकींचं प्रचंड नुकसान झालं आहे. काही चारचाकींच्या काचा फुटल्या. तर, काही चारचाकींच्या बोनेटचा चक्काचूर झाला.

Multiple Car Collision Shocks Pune
सनम बेवफा! नवरा बाथरूममध्ये गेला, बायकोचं बॉयफ्रेंडसोबत गुलुगुलु; पतीनं गळा दाबून संपवलं, लिपस्टिकनं भिंतीवर..

या भीषण अपघातामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अपघात घडताच वाहतूक पोलीस तसेच स्थानिकांनी मदतकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पोलिसांकडून वेळीच वाहतूक कोंडी सोडवण्यात आली. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

Multiple Car Collision Shocks Pune
कोबीच्या शेतात सापडला तरूणीचा रक्तानं माखलेला मृतदेह; 'असं' फुटलं हत्येचं बिंग

त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी अपघातातील गाड्या बाजूला केल्या असून, त्यांना मदत केली.

Multiple Car Collision Shocks Pune
२ दिवसांपूर्वी लग्न, हनिमूनला जाण्याची तयारी, पहाटे नवरदेवाचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला, नेमकं घडलं काय?

अपघातानंतर नवले पुलाबाबत मोठा निर्णय

पुण्यातील नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांच्या घटनांचा विचार करून प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून सेल्फी पॉइंटमार्गे नन्हे येथील मानाजीनगरकडे जाणारा रस्ता गुरूवारपासून कायमस्वरूपी बंद करण्यात आलाय. दरम्यान, या बदलामुळे साताऱ्याकडून पुण्याकडे येणाऱ्या आणि नन्हे परिसरात वळणाऱ्या वाहनचालकांना आता स्वामिनारायण मंदिराजवळील सर्व्हिस रोडचा वापर करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com