२ दिवसांपूर्वी लग्न, हनिमूनला जाण्याची तयारी, पहाटे नवरदेवाचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला, नेमकं घडलं काय?

Newlywed Groom Found Dead Before Honeymoon: राजस्थानच्या अलवरमध्ये लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांत तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. तरूणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?
Newlywed Groom Found Dead Before Honeymoon
Newlywed Groom Found Dead Before HoneymoonSaam
Published On

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या अवघ्या २ दिवसानंतर तरूणाचा बाथरूममध्ये संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळला आहे. तरूणाच्या आकस्मिक मृत्यूनंतर नववधूसह संपूर्ण कुटुंबाला हादरा बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरूण हनिमूनची तयारी करत होता. मात्र, हनिमूनला जाण्यापूर्वी त्याचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, तरूणाचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा शोध घेतला जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना शिवाजी पार्क पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. आदित्य जाटव (वय वर्ष ३०) असे मृत तरूणाचे नाव आहे. हा तरूण मसुरी येथील डीआरडीओमध्ये संयुक्त संचालक पदावर कार्यरत होता. त्यानं २५ नोव्हेंबर रोजी पोलीस कॉन्स्टेबल श्याम सिंग यांची मुलगी निव्याशी लग्न केले होते.

Newlywed Groom Found Dead Before Honeymoon
सनम बेवफा! नवरा बाथरूममध्ये गेला, बायकोचं बॉयफ्रेंडसोबत गुलुगुलु; पतीनं गळा दाबून संपवलं, लिपस्टिकनं भिंतीवर..

कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, आदित्य सकाळी साडेपाचच्या सुमारास वॉशरूममध्ये गेला होता. बराच वेळ तो बाहेर आला नाही. कुटुंबाने दार ठोठावले. पण आदित्यने दार उघडले नाही. कुटुंबियांनी दार तोडले. तेव्हा आदित्य बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

वधूचे आजोबा दुलीचंद यांनी सांगितले की, 'लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. मात्र, दुसऱ्या दिवशी आनंदाचे रूपांतर शोकात झाले. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मृत्यूचे नेमकं कारण शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल', या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Newlywed Groom Found Dead Before Honeymoon
'ऐश्वर्या राय मला लग्नाचा प्रस्ताव पाठवेल, मी तिचं मुस्लिम नाव..'; पाकिस्तानचा धर्मगुरू बरळला | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com