'भाड्यानं मुलगी हवी?' वृद्ध महिलेची अजब मागणी, TVवर दिली जाहिरात; फ्लॅट अन् पगारही देणार

Mother Offers Flat and Salary for a Rented Daughter: वृद्ध चिनी महिलेनं 'मुलगी भाड्यानं हवीय' अशी टिव्हीवर जाहिरात दिली होती. यात त्यांनी फ्लॅट आणि मासिक पगार देणार असल्याचं सांगितलं.
Mother Offers Flat and Salary for a Rented Daughter
Mother Offers Flat and Salary for a Rented DaughterAI
Published On

आपण साधारण भाड्यानं वस्तू घेतो. काही जण घर तर काही जण वाहन भाड्यानं घेतात. परंतु चीनमधून एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेनं 'मुलगी भाड्यानं हवी', अशी जाहीरात दिली आहे. त्यामुळे परिसरात काही लोकांचा आश्चर्याचा धक्का बसला आहे. वृद्ध चिनी महिला त्या मुलीला पगारासह फ्लॅट देखील देणार आहे. नेमकी जाहीरात काय? वृद्ध चिनी महिलेनं अशी जाहीरात का काढली? पाहूयात.

मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध महिला हेनान प्रांतातील रहिवासी आहे. महिलेचं नाव मा असून, त्या दोन मुलींची आई आहे. तिच्या २ मुलींपैकी एका मानसिकदृष्ट्या अक्षम आहे. तर, दुसरीनं तिच्याशी सर्व संबंध तोडले आहेत. एकटेपणा आणि आजारपणामुळे बेजार झालेल्या महिलेनं एक शक्कल लढवली. रक्ताची का नसेना, तिनं भाड्यानं मुलगी हवी, अशी जाहीरात दिली. वृद्ध महिलेनं ही जाहीरात टिव्हीवर दिली. तसेच एक फ्लॅट आणि सुमारे ३७,५०० रूपये मासिक पगार देणार असल्याचं सांगितलं.

Mother Offers Flat and Salary for a Rented Daughter
नवलेनंतर 'या' उड्डाण पुलावर भीषण अपघात, ८-१० गाड्या एकमेकांवर आदळल्या, काचा फुटल्या अन्...

हेनान प्रांतातील रहिवासी असलेल्या मा, अलिकडेच एका स्थानिक टिव्ही शोमध्ये तिची कहाणी सांगताना दिसल्या. त्यांनी शोमध्ये मोठ्या मुलीनं संबंध तोडले असल्याचं सांगितलं. तसेच लहान मुलगी मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची माहिती दिली. वृद्ध महिला देखील आजारपणामुळे त्रस्त आहे. त्यांचा नातेवाईकांशीही संपर्क तुटला आहे. पतीसोबतही घटस्फोट झाला आहे.

Mother Offers Flat and Salary for a Rented Daughter
मोठी बातमी! ऐन निवडणुकीत भाजच्या ३ बड्या नेत्यांची हकालपट्टी, पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

एकाकीपणामुळे वृद्ध महिलेनं जाहीरपणे भाड्याने मुलगी हवी आहे, असं सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेकडे आयुष्यभराची बचत आहे. तसेच एक फ्लॅट देखील आहे. त्या या गोष्टी अशा व्यक्तीला देऊ इच्छिक आहेत, जी त्यांची आईसारखी काळजी घेईल.

वृद्ध महिला तिच्या भाड्याच्या मुलीला नेमकं काय देणार?

दोन फ्लॅटपैकी १ फ्लॅट

दरमहा ३००० युआन (सुमारे ३७,५००)

घरातील सर्व वस्तू

रूग्णालयात जाताना सोबत येण्याची जबाबदारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com