Honey Trap Case  Saam Tv
देश विदेश

MHA Official Arrested In Honey Trap Case: हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या केंद्रीय मंत्रालयाच्या कर्मचाऱ्याला अटक, पाकिस्तानला पाठवली गोपनीय कागदपत्रे

Ghaziabad Police Arrested Naveen Pal: पोलीस तपासामध्ये या महिलेचे लोकेशन कराची असल्याचे समोर आले आहे.

Priya More

Ghaziabad News: केंद्रीय गृह मंत्रालयाचा (Central Home Ministry) कर्मचारी हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap Case) अडकला आहे. या कर्मचाऱ्याने पाकिस्तानला (Pakistan) गोपनीय दस्तावेज (classified documents) पाठवल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी (Ghaziabad Police) नवीन पाल याला अटक केली आहे. हा कर्मचारी सोशल मीडियावर एका महिलेला कोलकाताची (Kolkata) अंजली समजून तिच्या इशाऱ्यावर काम करत होता. पोलीस तपासामध्ये या महिलेचे लोकेशन कराची असल्याचे समोर आले आहे.

अंजली नावाची ही महिला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. कदाचित ती आयएसआयची अधिकारी किंवा कर्मचारी असू शकते. माहिती मिळवण्याच्या बदल्यात नवीन पालला 85 हजार रुपयेही देण्यात आले आहेत. हा संपूर्ण खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी नवीन पालला अटक केली. 12वी पास नवीन पाल हा भीमनगर, क्रॉसिंग रिपब्लिक कॉलनी येथील रहिवासी आहे. तो गृह मंत्रालयात कंत्राटी बहुउद्देशीय कर्मचारी (MTS) म्हणून कार्यरत होता.

गृहमंत्रालयातील एक कर्मचारी काही माहिती बाहेर पाठवत असल्याची माहिती देशाच्या गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. याच प्रकरणाची चौकशी करत असता नवीन पाल याच्याबाबत माहिती मिळाली. त्याच्या मोबाईलचे डिटेल्स काढले असता हा प्रकार उघड झाला. दोन महिन्यांपासून तो सर्व गोपनीय कागदपत्रे पाठवत असल्याची माहिती मिळाली आहे.

नवीन पाल हा अंजली नावाच्या महिलेशी व्हॉट्सअॅपवर चॅट करत होता. दोघांचे चॅट जप्त करण्यात आले आहे. पूर्वी अंजली गोड बोलायची. यानंतर तिने त्याची कागदपत्रे मागायला सुरुवात केली. ती जे काही म्हणेल, नवीन पाल तिला तशी माहिती देत होता. या बदल्यामध्ये ती नवीनला पेटीएमद्वारे पैसे पाठवायची. आतापर्यंत ८५ हजार रुपये तिने दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

नवीन पालच्या मोबाईलचा डेटा पोलिसांनी जप्त केला आहे. त्याने गृह मंत्रालयाच्या अनेक फाईल्सचे फोटो क्लिक करून पाठवल्याची माहिती मिळाली. यामध्ये G-20 शी संबंधित फाइल्सही आहेत. कागदपत्र पाठवण्याचे त्याला पाच ते दहा हजार रुपये मिळायचे. त्याने अनेक नकाशेही पाठवले आहेत.

पोलीस चौकशीत त्याने सांगितले की, मला माहिती नव्हते की कागदपत्र हे पाकिस्तानला जात आहेत. नवीनचा एका टोळीशी संबंध असल्याचाही संशय आहे. 'नवीनवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. त्याच्याकडून अॅपलचा फोन जप्त करण्यात आला आहे. त्याच्या बँक खात्यांचा तपशीलही काढला जाणार आहे.', अशी माहिती डीसीपी देहात शुभम पटेल यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT