Nagpur : १२ वीच्या विद्यार्थ्याची मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

Nagpur News : नागपूरमध्ये १२ वीच्या विद्यार्थ्याने एम्प्रेस मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
Nagpur : १२ वीच्या विद्यार्थ्याची मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ
Nagpur 12th Class Yash zhade Student SucideSaam Tv
Published On
Summary
  • नागपूरमध्ये १२ वीच्या विद्यार्थ्याने एम्प्रेस मॉलमधून उडी मारून आत्महत्या केली

  • मृत विद्यार्थ्याचे नाव यश सुनील झाडे

  • आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

  • पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे

पराग ढोबळे, नागपूर

Nagpur 12th Class Yash Jhade Student Sucide नाशिकमध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच नागपूरमध्ये १२ वीच्या विद्यार्थ्याने एम्प्रेस मॉलमधून उडी मारून आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. यश सुनील झाडे असं मृतक विद्यार्थ्यांच नाव असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यश सुनील झाडे हा मानेवाडा येथील जवाहर नगर परिसरात राहत होता. इयत्ता १२ वीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. मात्र तरीही तो दररोज घरच्यांना “पेपर आहे” असे सांगून घराबाहेर पडत होता. कालही तो घरातून पेपर असल्याचं सांगून निघाला.

Nagpur : १२ वीच्या विद्यार्थ्याची मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ
Mumbai : 'बुलाती है मगर जाने का नहीं' पुरुषांना जाळ्यात ओढायच्या, कॅफेत नेऊन भलतंच करायच्या, मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर

मात्र घरातून निघाल्यानंतर तो रात्री उशिरापर्यंत परतला नाही. तसेच त्याचा फोनही बंद असल्याने कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन तपास सुरु केला. पोलीस तपासादरम्यान अशी माहिती मिळाली की, यशने एम्प्रेस मॉलमधून चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे उघड झाले.

Nagpur : १२ वीच्या विद्यार्थ्याची मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ
Kalyan : कल्याणमध्ये रक्ताने माखलेल्या कारचे रहस्य उलगडले, इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्याने केली उबर चालकाची हत्या; धक्कादायक कारण समोर

यशने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप उघड झाले नसून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com