Sudhir Mungantiwar Latest News: राज्यात ७ अपिलीय न्यायाधिकरण स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

Gst Council Meeting 2023: राज्यात ७ अपिलीय न्यायाधिकरण स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
Sudhir Mungantiwar Latest News
Sudhir Mungantiwar Latest NewsSaam Tv
Published On

Sudhir Mungantiwar Latest News: वस्तू व सेवाकर परिषदेच्या 50 व्या बैठकीत महाराष्ट्रामध्ये 7 अपिलीय न्यायाधिकरण (ट्रिब्युनल) स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यांनी सांगितलं आहे.

वित्त मंत्रालयाच्यावतीने आज वस्तू आणि सेवा कर परिषदेची 50 वी बैठक येथील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अर्थमंत्री निर्मला सीतारामन होत्या. बैठकीत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.

Sudhir Mungantiwar Latest News
Rahul Gandhi On Sharad Pawar: 'पवार आणि ठाकरेंना न दुखवता काम करा', राहुल गांधींचा राज्यातील काँग्रेस पक्षातील नेत्यांना संदेश

राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार या परिषदेस राज्याच्यावतीने उपस्थित होते. यासह राज्याच्या वित्त सचिव शैला ए. आणि जीएसटी आयुक्त राजीव कुमार मित्तल उपस्थित होते. आज पार पडलेल्या 50व्या बैठकीत विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले.  (Latest Marathi News)

बैठकीनंतर मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले, आज झालेल्या वस्तू व सेवाकर परिषदेच्या महत्वाच्या बैठकीत राज्यात वस्तू व सेवाकराशी निगडीत तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी राज्यात 7 अपिलीय न्यायाधिकरण असावे, अशी राज्याची मागणी होती. आजच्या बैठकीत ही मागणी मंजुरी करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Sudhir Mungantiwar Latest News
Chhatrapati Shivaji Maharaj Rupee Coin: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ विशेष नाणे काढावे, मुनगंटीवार यांची केंद्राकडे मागणी

ऑनलाईन खेळ, घोड्याची शर्यत (हॉर्स रेसिंग), कॅसीनो या बाबींवर आता 28% टक्के कर आकारण्यात येणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. कायद्यामध्ये ऑनलाईन हा शब्द नसल्याने यासंदर्भात काही खटले न्यायालयात दाखल करण्यात आले होते. आता मात्र कायद्यात अतिशय स्पष्टता आणण्यात आल्यामुळे ऑनलाईन गेमिंगचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे राज्याच्या महसुलात निश्चितच भर पडेल, असेही मंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com