Rahul Gandhi On Sharad Pawar: 'पवार आणि ठाकरेंना न दुखवता काम करा', राहुल गांधींचा राज्यातील काँग्रेस पक्षातील नेत्यांना संदेश

Rahul Gandhi On Uddhav Thackeray: 'पवार आणि ठाकरेंना न दुखवता काम करा', राहुल गांधींचा राज्यातील काँग्रेस पक्षातील नेत्यांना संदेश
Rahul Gandhi Meeting With Maharashtra Congress Leaders
Rahul Gandhi Meeting With Maharashtra Congress Leaders Saam TV
Published On

Rahul Gandhi Meeting With Maharashtra Congress Leaders : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची आज राजधानी नवी दिल्लीत बैठक पार पडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थित ही बैठक पार पडली. या बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे आणि इतर राज्यातील काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते.

या बैठकीत महाराष्ट्राची सद्यस्थिती आणि आगामी निवडणुकांची रणनीती काय असावी याव चर्चा झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकित राहुल गांधी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना न दुखवता राज्यात काम करा, असा संदेश राज्यातील सर्व नेत्यांना दिला आहे.

Rahul Gandhi Meeting With Maharashtra Congress Leaders
Chhatrapati Shivaji Maharaj Rupee Coin: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ विशेष नाणे काढावे, मुनगंटीवार यांची केंद्राकडे मागणी

वर्षा गायकवाड या बैठकीत शेवटी बोलल्या म्हणून राहुल गांधी नाराज झाले होते. महिलांना बोलायला अगोदर संधी द्यायला हवी, अशी सक्त ताकीद राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांना दिली, अशी माहितीही सूत्रांनी दिली. (Latest Marathi News)

आगामी काळात राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष राहील आशा पद्धतीने कामाला लागा. कर्नाटक विजयानंतर राज्यात देखील आपण जिंकू शकतो ही खात्री आपल्याला आली आहे. त्यामुळं थेट लोकांशी संपर्क वाढवा, राज्यातील नेत्यांशी संवाद साधताना असं राहुल गांधी म्हणाले असल्याचं बोललं जात आहे.

Rahul Gandhi Meeting With Maharashtra Congress Leaders
South Artist Arrest : सोशल मीडियावर VIDEO शेअर करणं आलं अंगलट, साऊथमधील प्रसिद्ध स्टंट मास्टर, अभिनेत्याला अटक

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रभारी एच के पाटील यांच्या कामावर नाराज असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. एच के पाटील मंत्री झाल्यानंतर आता राज्यात नवा प्रभारी दिला जाऊ शकतो. नवीन प्रभारी देताना भांडण न लावणारा आणि सगळ्या जिल्ह्यात फिरणारा द्या, अशी मागणी नाना पटोले यांनी बैठकीत पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com