South Industry : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध स्टंट मास्टर आणि अॅक्टर कनाल कन्ननला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर कोर्टाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. कनाल कन्ननवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होता.
कनाल कन्ननने सोशल मीडियावर एक आपत्तीजनक व्हिडीओ शेअर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कन्याकुमारी जिल्हा पोलिसांनी १० जुलै रोजी अटक केली होती. कन्ननने शेअर कलेल्या व्हिडीओमध्ये एक परदेशी चर्चमधील फादरच्या पोशाखात एका महिलेसोबत नाचताना दिसत होता.
हा व्हिडीओ शेअर करताना कनाल कन्ननने जे लिहिलंय त्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 'ही परकीय धार्मिक संस्कृतीची स्थिती...', असं त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं. (Latest Entertainment News In Marathi)
कनाल कन्नन याच्या पोस्टनंतर कन्याकुमारीतील थिट्टुविलाई भागातील डीएमके आयटी विंगचे सदस्य ऑस्टिन बेनेट यांनी नागरकोइल गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. यानंतर नागरकोइल सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कनाल कन्नन याच्यावर २ कलमांखाली गुन्हा दाखल केला.
कनालने स्टंट मास्टर म्हणून सुपरस्टार रजनीकांत ते थलपथी विजयसह अनेक स्टार्ससोबत काम केलं आहे. कनाल हिंदू मुन्नानी या हिंदू संघटनेचा राज्य अध्यक्ष आणि कला आणि साहित्य शाखेचा प्रमुख देखील आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.