Saibaba Temple: साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी

Jalgaon Slab Collapses at Sai Baba Temple: जळगावमध्ये साईबाबा मंदिराचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या घटनेत ७ जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jalgaon: साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी
Saibaba TempleSaam TV
Published On

Summary:

  • जळगावच्या साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला

  • पाळधी गावात बांधकामादरम्यान ७ कामगार जखमी झाले

  • जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले

  • मंदिर परिसरातील बांधकाम सुरक्षिततेबाबत प्रश्न

संजय महाजन, जळगाव

जळगावमध्ये साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये ७ कामगार जखमी झाले. जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावामध्ये ही घटना घडली. साईबाबा मंदिराच्या परिसरात भक्त निवासाचे बांधकाम सुरू असून या कामादरम्यान स्लॅब कोसळल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगार्‍याखाली अडकलेल्या कामगारांना तात्काळ बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतिही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे ही घटना घडली. साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या भक्तनिवासामध्ये सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली दबून ७ कामगार जखमी झाले आहेत. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती प्रताप पाटील यांनी दिली.

Jalgaon: साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी
Jalgaon: महाराष्ट्र हादरला! ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आई घरात नसताना नातेवाईकाचं भयंकर कृत्य

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढत मदतकार्य केले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जळगावच्या शासकीय रुग्णालयात हलविले. जखमी कामगारांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे बांधकामाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून स्लॅब कोसळण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून समोर आलेले नाही.

Jalgaon: साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी
Jalgaon : विम्याच्या ५० लाखांसाठी कट रचला, पण गेम फसला; डॉक्टर अन् ४ पोलिसांना बेड्या, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com