Holi 2025 Controversy in UP Saam Tv
देश विदेश

Holi 2025 : होळीच्या रंगांचा त्रास होत असेल, तर देश सोडून जा; योगी सरकारच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान

Uttar Pradesh : योगी सरकारमधील मंत्र्याने ज्याला होळीच्या रंगांचा त्रास होतो, त्याने देश सोडून जावे असे विधान केले आहे. या विधानामुळे उत्तरप्रदेशच्या राजकारणात नवीन वाद सुरु झाल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

होळीचा सण आज भारतासह देशभरात साजरा केला जाणार आहे. अशातच योगी सरकारमधल्या एका मंत्र्याच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होत आहे. ज्या लोकांना होळीच्या रंगांचा त्रास होत आहे त्यांनी देश सोडावा असे वक्तव्य उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री संजय निषाद यांनी केले आहे. गोरखपूरच्या होली मिलन समारोहमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले.

संजय निषाद हे योगी सरकारमध्ये मंत्री आहे. भाजपाचा उत्तरप्रदेशमधील मित्र पक्ष निषाद पार्टीचे ते प्रमुख आहेत. होली मिलन समारोहमध्ये त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'जुम्मा म्हणजेच शुक्रवारच्या नमाजासाठी लोक एकत्र येतात. नमाज पठणानंतर ते एकमेकांना मिठी मारतात. होळी साजरी करतानाही तेच केले जाते. दोन्ही सण एकत्र यायची शिकवण देतात. काही नेत्यांना ही ऐक्याची भावना नकोशी आहे.'

एका विशेष वर्गातील लोकांच्या मनात विष पेरुन त्यांची दिशाभूल केली जात आहे. तेही या देशाचे नागरिक आहेत, असे निषाद म्हणाले. 'पण जर कोणाला रंगांचा त्रास होत असेल, तर त्यांनी घरात राहू नये. त्यांनी देश सोडावा. रंग लावल्याने, रंगांनी खेळल्याने आस्थेला धक्का बसतो असेही काहीजण म्हणतात. पण हे लोक संकोच न करता रंगीत कपडे घालतात. रंगांचे सर्वात मोठे व्यापारी याच समाजातील लोक असतात, असेही संजय निषाद म्हणाले.

होळीचा रंगाचा सण हा शुक्रवारी आल्याने उत्तरप्रदेशमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात केले जाणार आहेत. होळीच्या दिवशी कोणत्याही प्रकारची वाईट घटना टाळण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे संजय निषाद यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT