Yash Shirke
होळी हा सण संपूर्ण देशात साजरा केला जातो.
कोकणात साजरी होणारी होळी म्हणजेच शिमगा खास असतो.
शिमगोत्सव सुरु झाला, की कोकणात हाकारे देत शंकासुराचे आगमन होते, असे म्हटले जाते.
पुराणांनुसार, शंकासूर किंवा संकासूर हा राक्षस होता.
शंकासूराने वेद पळवले होते. त्यामुळे भगवान विष्णूने त्याचा वध केला होता असे म्हटले जाते.
काळा वेश, डोक्यात शंकू आकाराचा मुखवटा, अंगावर पांढऱ्या भस्माचे पट्टे, लांबलचक पांढरी दाढी, लोंबणारी लाल जीभ आणि कंबरेला घुंगरांचा चाळ, असे शंकासुराचे रुप असते.
पुराणांमध्ये राक्षस असे उल्लेख असलेल्या शंकासुराला कोकणातील शिमगोत्सवाला खास महत्त्व असते.
नमनात त्याचे स्थान गणपती आख्यानाआधी असते. अग्रक्रम त्याला मिळाला आहे.
कोकणात देवांच्या पालख्यासह शंकासूर गावभोवनी घेतो. शंकासूराच्या वेठीचा मार खाणे, आशीर्वाद समजले जाते.
Holi 2025: होळीचे रंग काही केल्या निघत नाहीत, फॉलो करा 'हे' घरगुती उपाय