ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
यंदा धुलिवंदन १४ मार्चला साजरी केली जाणार आहे. होळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
होळीचे रंग काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी वापरत असतो. पण या घरगुती उपायांनी तुम्ही हे अगदी सहजरित्या करु शकता.
बेसन, दही आणि हळद यांना एकत्रित करुन पेस्ट तयार करा. आणि स्क्रबप्रमाणे चेहऱ्यावर लावा.
गुलाबजल आणि लिंबाचा रस एकत्रित करुन चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा.
मुलतानी माती आणि गुलाबजल मिक्स करुन पॅक तयार करा. आणि चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर धुवून टाका.
साबणाऐवजी माइल्ड क्लींजर किंवा बेबी शॅम्पू वापरा. यामुळे रंग निघण्यात मदत होईल.
अंघोळीच्या आधी केसांमध्ये खोबरेल तेल लावा. यामुळे रंग सहजरित्या निघून जाईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.