Yash Shirke
होळी हा सण भारतभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
पण काशी शहरामध्ये होळी वेगळ्या प्रकारे साजरी केली जाते.
काशीत रंगांनी नाही तर स्मशानातील चितेच्या राखेने होळी खेळली जाते.
मोक्ष प्रदान करणाऱ्या काशीमध्ये हरिश्चंद्र घाटावर चोवीस तास चिता धगधगत असते.
हरिश्चंद्र घाटावरच्या चितेच्या राखेचा वापर करुन होळी खेळली जाते.
आमलकी एकादशी या दिवशी ही आगळी वेगळी होळी खेळली जाते.
चितेच्या राखेने खेळल्या जाणाऱ्या होळीला मसान की होली असे म्हटले जाते.
विवाहानंतर शंकर-पार्वती ज्या वेळेस काशीला आले होते. तेव्हा त्याचे स्वागत करण्यासाठी राख उधळून होळी साजरी करण्यात आली होती.
Next : Holi 2025 : कोकणातल्या शिमगोत्सवात खास महत्त्व असणारा 'शंकासूर' कोण होता?