नवी दिल्ली : लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा भीषण हल्ला झाला आहे. लेबनॉनमध्ये मंगळवारी पेजर्सचा एकाच वेळी स्फोट झाला. त्यानंतर आज बुधवारी वॉकी-टॉकीमध्ये स्फोट झाला. या हल्ल्यात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४५० हून अधिक जखमी झाले आहेत. लेबनॉनची राजधानी बेरुतमध्ये अनेक ठिकाणी हल्ले झाल्याची माहिती हाती आली आहे.
लेबनॉन देश मंगळवारी चांगलाच हादरला. कारण अचानक अनेक लोकांच्या पेजर्समध्ये स्फोट झाले. या स्फोटांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला तर 3000 हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्यामागे इस्त्राईलच्या मोसादचा हात असल्याचा दावा करण्यात येतोय. इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसादने तैवान-मेड 5 हजार पेजर्समध्ये छोट्या प्रमाणात स्फोटकं ठेवली होती. त्याचाच स्फोट झाल्याचं लेबनॉनच्या सुरक्षा यंत्रणेंचं म्हणणं आहे. हिजबोल्लाच्या कमांडरला मोबाईल लोकेशन ट्रेस करुन ठार केलं. त्यामुळे हिजबोल्लानं पेजर वापरायचा निर्णय घेतला. मात्र मोसादनं त्यावरही कडी करत लेबनॉन आणि सिरियातल्या पेजरमध्ये स्फोट घडवून आणले. ऑपरेशन बिलो द बेल्टच्या माध्यमातून कसे घडवले हे स्फोट ते पाहूयात.
- लोकेशन ट्रेस व्हायला नको म्हणून हिजबोल्लाकडून पेजरचा वापर
- हिजबोल्लाकडून 5000 हजार पेजर्सची ऑर्डर
- हेजबोल्लाविरोधात इस्त्रायलचं मिशन 'बिलो द बेल्ट'
- डिलीव्हरीच्या आधीच पेजरमध्ये छेडछाड
- सर्व पेजर्समध्ये 3 - 15 ग्रॅम विस्फोटक पेरले
- पेजरचं तापमान वाढवून स्फोट घडवले
- मोसादने PETN नावाचे स्फोटक पेजर्समध्ये ठेवल्याचा दावा
पेजर बनवणाऱ्या तैवानी कंपनीनं या हल्ल्याशी संबंध नसल्याचं म्हणत युरोपातील कंपनीला पेजर्स विकण्याची परवानगी होती अशी माहिती दिलीये. मात्र य़ामुळे आता मोबाईल फोनद्वारेही असे हल्ले होऊ शकतात का ? असा सवाल उपस्थित झालायं.
पेजरमध्ये वापरण्यात आलेली छोटी स्फोटकं लॅपटॉपच्या बॅटरीमध्येही बसवता येते. याशिवाय स्मार्टफोनच्या बॅटरीमध्येही ते बसू शकतं. तापमान वाढल्यानंतर, फोनचे तापमान वाढते आणि नंतर फोन स्फोटकाप्रमाणे घातक ठरु शकतो. त्यामुळे आता दहशतवादी किंवा शत्रू राष्ट्रांना टार्गेट करण्यासाठी मोबाईलमध्येही असे स्फोट घडवले जाऊ शकतात. त्यामुळे जगासमोर आता अशा हल्ल्यांचं नवं आव्हान असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.