Mobile Use: मोबाईल मुलांच्या हातात देताय, सावधान! मोबाईलच्या वापरामुळे डोळे होतात वाकडे?

Mobile Use: मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यावर वाईट परिणाम होतो असा धक्कादायक अहवाल समोर आलाय.
Mobile Use: मोबाईल मुलांच्या हातात देताय, सावधान! मोबाईलच्या वापरामुळे डोळे होतात वाकडे?
Mobile Use
Published On

मुलांच्या हातात मोबाईल देताय तर वेळीच सावध व्हा. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचे डोळे वाकडे होऊ शकतात. इतकंच नव्हे तर दृष्टीही जाऊ शकते. मुलं रडायला लागली की आपण मुलांच्या हातात मोबाईल देतो. मात्र, मुलांना मोबाईल देणं महागात पडेल. एका रिसर्चमध्ये धक्कादायक माहिती समोर आलीय.

Mobile Use: मोबाईल मुलांच्या हातात देताय, सावधान! मोबाईलच्या वापरामुळे डोळे होतात वाकडे?
Fact Check : इन्स्टाग्राम बंद होणार, फोटो-व्हिडिओ सेव्ह करा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

मोबाईलमुळे मुलांचे डोळे वाकडे

2001 साली मुलांना कमी दिसण्याची समस्या 7 टक्के होती

2011 साली मुलांना कमी दिसण्याची समस्या 13.5 टक्क्यांवर गेली

2021 मध्ये 20 ते 22 टक्के एवढी वाढली.

गेल्या 20 वर्षात मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे कमी दिसण्याची समस्या तीन पट वाढलीय...स्क्रीन टाईम म्हणजेच मोबाईलचा पाहण्याचा वेळ वाढत असल्यामुळे दृष्टी कमी होतेय. रात्री अंधारात मोबाईल पाहिल्यामुळे डोळे सुकतात आणि थेट नजरेवर परिणाम होता. अनेक मुलांना चष्मा लागलाय. 3 हजार शाळांमध्ये ही स्टडी केल्यानंतर मुलांची नजर कमी होत असल्याचं निष्पन्न झालंय.

मुलांची नजर का कमी होतेय.? आणि मोबाईलमुळे मुलांचे डोळे का वाकडे होतायत...? हे सविस्तर पाहुयात.

मोबाईलमुळे मुलांचे डोळे वाकडे

सध्या मोबाईलचा वापर लहान मुलांमध्ये जास्त वाढलाय.

मुलांच्या डोळ्यांची वाढ होत असल्यामुळे मोबाईलमुळे गंभीर परिणाम होतात.

मोबाईलचा खूप वापर केल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.

मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचे डोळे वाकडे होतात.

सतत मोबाईल पाहिल्यामुळे डोळ्यांना स्ट्रोकही येऊ शकतो.

मोबाईलचा वापर जेवढा चांगला तेवढाच वाईट आहे...त्यामुळे मुलांना जास्त मोबाईलची सवय लावू नका. त्यांना मैदानी खेळ शिकवा, त्यांना वेळ द्या...नाहीतर मोबाईलचा अतिवापर मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com