Shocking News  Saam Tv
देश विदेश

Shocking News: आपल्या मुलासारखं सांभाळतात आणि नंतर..., बकरी ईदच्या दिवशी मोहम्मदने स्वत:चीच दिली कुर्बानी

Heartbreaking Qurbani: उत्तर प्रदेशमध्ये बकरी ईदच्या दिवशी भयंकर घटना घडली. बकरी ईदच्या दिवशी ईश मोहम्मदने स्वत:चीच कुर्बानी दिली. स्वत:चाच गळा चिरून त्याने आत्महत्या केली.

Priya More

उत्तर प्रदेशातील देवरियामधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका ६० वर्षीय व्यक्तीने बकरी ईदच्या दिवशी बकरीची कुर्बानी देण्याऐवजी स्वतःची कुर्बानी दिली. या व्यक्तीने स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केली. गळा चिरण्यापूर्वी या व्यक्तीने एक पत्र देखील लिहिले आहे ज्यामध्ये त्याने स्वत:ची कुर्बानी देण्यामागचे कारण नमूद केले आहे. स्वत:चा गळा कापल्यानंतर हा माणूस जवळपास एक तास वेदनेने तडफडत राहिला, त्यानंतर त्याला गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. पण उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना देवरियाच्या गौरी बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उधोपूर गावातील आहे. याठिकाणी राहणारा ६० वर्षीय ईश मोहम्मद याने ईदच्या दिवशी स्वत:ची कुर्बानी दिली. मोहम्मद ईद-उल-अजहाची नमाज अदा केल्यानंतर घरी आले. त्यानंतर त्यांनी घराबाहेर बांधलेल्या झोपडीत गळा चिरून आत्महत्या केली. सुमारे एक तास झोपडीत ईश मोहम्मद वेदनेने तडफडत होते. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला.

मोहम्मद रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हे दृश्य पाहून त्यांच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. ईश मोहम्मदच्या कुटुंबीयांनी त्यांना ताबडतोब गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये नेले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी बीआरडी मेडिकल कॉलेज गोरखपूर येथे पाठवण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

ईश मोहम्मदने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली होती. या नोटमध्ये त्यांनी लिहिले की,'लोक त्यांच्या घरामध्ये बकऱ्यांना आपल्या मुलासारखं पाळतात आणि नंतर त्यांची कुर्बानी देतात. तो देखील एक जिवंत प्राणी आहे. कुर्बानी तर माणसाची दिली पाहिजे. मी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या नावाने स्वतःची कुर्बानी देत आहे. मला कोणीही मारले नाही. मला शांततेत दफन करा आणि माझी कबर त्याच ठिकाणी बनवा जिथे खुंटी बांधली आहे. कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT