पुणे, ता. १५ सप्टेंबर
Eid a milad 2024 Holiday Pune: राज्य सरकारने अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकत्र आल्याने ईद- ए- मिलादच्या सुट्टीमध्ये बदल केला होता. सोमवार दि. १६ सप्टेंबर २०२४ची सुट्टी बुधवारी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता याबाबत महत्वाची अपडेट समोर आली असून ही सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर रोजीच कायम करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्य शासनाने १० नोव्हेंबर २०२३ च्या राजपत्रानुसार अधिसूचित केलेल्या सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली होती. ही सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर रोजीच कायम करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आज जारी केले आहेत. गणपती विसर्जन म्हणजेच अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकत्र आल्याने काही मुस्लीम संघटनांच्या मागणीनुसार राज्य सरकारने ईदच्या सुट्टीत बदल करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार सोमवारची (ता, १६ सप्टेंबर) सुट्टी बुधवारी (१८, सप्टेंबर) देण्यात आली होती. मात्र आता याबाबत महत्वाची अपडेट समोर आली असून राज्य शासनाने १० नोव्हेंबर २०२३ च्या राजपत्रानुसार अधिसूचित केलेल्या सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली होती. त्यानुसार ही सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर रोजीच कायम करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आज जारी केले आहेत.
दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी ईद- ए- मिलादचा सण आहे. यादिवशी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात जुलूस काढून सण साजरा करतात. मात्र १७ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन आहे. त्यामुळे दोन्ही सण शांततेत पार पडावेत, दोन्ही सणांमध्ये सलोखा कायम राहावा, यासाठी सोमवारची सुट्टी बुधवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र हा निर्णय फक्त मुंबई आणि उपनगरासाठी घेण्यात आला असून इतर जिल्ह्यांमध्ये सोमवारीच सुट्टी राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.