Mumbai Local Train News : अनंत चतुर्दशीला गणेशभक्तांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; रात्रभर सुरु राहणार लोकल, जाणून घ्या वेळापत्रक

ganesh visarjan Mumbai Local Train time table : अनंत चतुर्दशीला गणेशभक्तांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय घेतला आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्रभर लोकल सुरु राहणार आहेत.
अनंत चतुर्दशीला गणेशभक्तांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; रात्रभर सुरु राहणार लोकल, जाणून घ्या वेळापत्रक
Mumbai Local Train NewsSaam Tv
Published On

रुपाली बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : अनंत चतुर्दशीला रेल्वे प्रशासनाने गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. अनंत चतुर्दशीला मुंबईत रात्रभर लोकल सेवा सुरु राहणार आहेत. त्यामुळे गणेशविसर्जनानंतर भक्तांची होणार गैरसोय टळली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने रविवार आणि अनंत चतुर्दशीच्या दिवसाच्या वेळापत्रकाविषयी माहिती दिली आहे.

मध्य रेल्वे १४ /१५ सप्टेंबरच्या रात्री, १५ सप्टेंबर /१६ सप्टेंबरच्या रात्री, १७ सप्टेंबर/१८ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मार्गावर प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ठाणे आणि परतीच्या प्रवासासाठी या २२ विशेष रात्रीच्या उपनगरीय गाड्या चालवणार येणार आहे.

अनंत चतुर्दशीला गणेशभक्तांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; रात्रभर सुरु राहणार लोकल, जाणून घ्या वेळापत्रक
Central Line Railway Station Name: कर्जत ते CSMT दरम्यान नेमकी किती रेल्वेस्थानके? नावं तुम्हाला माहीत आहेत का? मग ही यादीच वाचा!

हार्बर लाइनवर विशेष उपनगरीय गाड्या या गणेश विसर्जनाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावर धावतील. विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण/ठाणे/पनवेल दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील.

डाउन मेन लाइनवर (दि. १४/१५.०९.२०२४; दि. १५/१६.०९.२०२४ आणि दि. १७/१८.०९.२०२४ रोजी)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.१० वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -ठाणे विशेष १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०३.३० वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कल्याण विशेष १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०४.५५ वाजता पोहोचेल.

अप मेन लाइनवर (दि. १४/१५.०९.२०२४; दि. १५/दि. १६.०९.२०२४ आणि दि. १७/दि. १८.०९.२०२४ रोजी)

कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २ कल्याण येथून ००:०५ वाजता सुटेल आणि ०१.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २ ठाणे येथून ०१.०० वाजता सुटेल आणि ०२.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ४ ठाणे येथून ०२.०० वाजता सुटेल आणि ०३.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

डाऊन हार्बर लाईनवर ( दि. १७/१८.०९.२०२४ रोजी) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०२.५० वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष ३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२.४५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०४.०५ वाजता पोहोचेल.

अनंत चतुर्दशीला गणेशभक्तांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; रात्रभर सुरु राहणार लोकल, जाणून घ्या वेळापत्रक
Central Railway Recruitment : मध्य रेल्वेत २,४२४ पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू, दहावी पास उमेदवार करू शकतात अर्ज; जाणून घ्या सविस्तर

अप हार्बर लाईनवर (फक्त दि. १७/१८.०९.२०२४ रोजी)

पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २ पनवेल येथून ०१.०० वाजता सुटेल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.२० वाजता पोहोचेल.

पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ४ पनवेल येथून ०१.४५ वाजता सुटेल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०५ वाजता पोहोचेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com