Government Holiday: सोमवारची शासकीय सुट्टी रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Eid Holiday Reschedule On 18th September: शासकीय कर्मचाऱ्यांना सोमवारी ईदची सुट्टी होती. मात्र, मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने ही सुट्टी बुधवारी देण्यात आली आहे.
Eid Holiday
Eid HolidaySaam Tv
Published On

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. येत्या मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. ११ दिवसांच्या बाप्पाचे मंगळवारी विसर्जन होणार आहे. त्याचसोबत सोमवारी ईद-ए मिलाद सण आहे. त्यामुळे सोमवारी शासकीय सुट्टी आहे. परंतु मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने ईदची सुट्टी १८ सप्टेंबरला देण्यात आली आहे.

ईद-ए मिलाद हा मुस्लिम धार्मियांचा सण आहे. यावेळी जुलूस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरम्यान, १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे दोन्ही समाजांमध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या उद्देशाने ईद ए मिलादची सुट्टी बुधवारी देण्यात आली आहे.

Eid Holiday
Mumbai Local Train News : अनंत चतुर्दशीला गणेशभक्तांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; रात्रभर सुरु राहणार लोकल, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये बुधवार जुलूस कार्यक्रम करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवानी घेतला आहे. त्यामुळे ईदची सुट्टी बुधवारी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई शहर, मुंबई उपनगर याव्यतिरिक्त राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी १८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, असा निर्णय घ्यावा, असं प्रशासन विभागाने कळवले आहे. त्यामुळे आता ईद ए मिलादची सुट्टी बुधवारी मिळणार आहे.

Eid Holiday
Mumbai Crime : चेंबुर हादरलं! रिक्षा चालकाने केला १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

सरकारी कर्मचाऱ्यांना लाँग वीकेंड मिळणार आहे. अनंत चतुर्दशी आणि ईदची सुट्टी लागोपाठ आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दोन दिवस सलग सुट्टी मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुस्लीम आणि हिंदू बांधवांमध्ये सलोखा राहावा, यामुळे हा निर्णय घेतला आहे.

Eid Holiday
Maharashtra Politics : अजितदादा म्हणतात आता मीच साहेब; राष्ट्रवादीतील दोन गटांत साहेबांवरुन जुंपली, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com