Pakistan's minister Hanif Abbasi issued a nuclear threat to India Saam TV News
देश विदेश

India vs Pakistan : तर आम्ही तुमचा श्वास बंद करू...पाकिस्तानकडून भारताला अणुबॉम्बची पोकळ धमकी!

Hanif Abbasi On Ind-Pak War : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द केल्यावर पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. भारत-पाकिस्तान तणाव आणखी वाढला आहे.

Namdeo Kumbhar

Pakistan's minister Hanif Abbasi issued a nuclear threat to India : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकस्तानची कोंडी करण्याचा प्लान आखला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारताने सिंधू करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधू करार रद्द झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता वाढली असून भारताला पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी रक्ताचे पाट वाहतील अशी धमकी दिली होती. आता रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अण्वस्त्रांची पोकळ धमकी दिली आहे. तुम्ही आमचे पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू. गौरी, शाहीन, गझनवी आणि १३० अण्वस्त्रं भारतासाठीच ठेवली असल्याचा दर्पोक्तीपूर्ण दावा त्यांनी केला आहे. यावरूनच सिंधू करार रद्दीकरणानंतर पाकिस्तानचा थयथयाट स्पष्टपणे समोर येतोय.

पाकिस्तानची सर्व परमाणु हत्यारे फक्त भारतासाठीच राखून ठेवलेली आहेत, अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे. हनीफ यांच्या अण्वस्त्रांच्या विधानामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आणखी वाढले आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर हनीफ अब्बासींचे हे वक्तव्य गंभीर पद्धतीने घेतले जात आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १९६० चा सिंधू जल करार स्थगित केला.पहलगाम हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानने सीमापार दहशतवाद थांबवला नाही, तर करार स्थगित राहील, असे २३ एप्रिल रोजी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्रा यांनी स्पष्ट केले. यामुळे पाकिस्तानच्या शेती, जलसिंचन आणि वीजनिर्मितीवर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांवर पाकिस्तान ८० टक्के अवलंबून आहे. त्यामुळे पाकिस्तानचा जळपळाट होत आहे.

अण्वस्त्रांच्या या धमकीमुळे भारत-पाक संबंध तणावपूर्ण झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठ्या प्रमाणात चिंता वाढली आहे. पाकिस्तानने दिलेल्या अण्वस्त्रांच्या धमकीवर भारताने अद्याप प्रत्युत्तर दिलेले नाही. परंतु काश्मीरमधील शांतता आणि दहशतवादविरोधी कारवायांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भारताकडून जम्मू काश्मीरमध्ये कारवाई करण्यात येत आहे. संशयित दहशतवादी अथवा दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT