Gurugram Wall Collapsed Viral CCTV Footage:  Saamtv
देश विदेश

Gurugram Video: क्षणात होत्याच नव्हतं! स्मशानाची भिंत कोसळून ४ जणांचा मृत्यू; हृदयद्रावक घटनेचा VIDEO

Gurugram Wall Collapsed Viral CCTV Footage: हरियाणामधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गुरुग्राम येथे स्मशानभूमीची भिंत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून चार जणांचा मृत्यू झाला.

Gangappa Pujari

हरियाणामधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गुरुग्राम येथे स्मशानभूमीची भिंत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून चार जणांचा मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झाले आहेत. ही भयंकर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुग्राममधील सायबर सिटीच्या मदनपुरी रोडवरील रामबाग परिसरात स्मशानाची भिंत कोसळून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर या घटनेत ६ जण जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी 5.30 ते 6 च्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.

स्मशानभूमीलगत असलेल्या वसाहतीतील काही लोक शनिवारी सायंकाळी रामबाग भिंतीजवळ बसले होते. यावेळी तेथे काही मुले खेळत होती. अचानक स्मशानाची भिंत कोसळली आणि काही लोक व लहान मुले त्याखाली सापडली. घटना घडताच स्थानिक लोकांनी तातडीने ढिगारा उचलण्यास सुरुवात केली आणि ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना रुग्णालयात नेले.

उपचारादरम्यान पप्पू, कृष्णा, मनोज आणि निष्पाप मुलगी खुशबू यांचा मृत्यू झाला. तर इतर लोकांवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोक भिंतीजवळ बसून बोलत आहेत, त्यानंतर अचानक भिंत कोसळली. लोक बेसावध असल्याने त्यांना पळण्याची संधीच मिळाली नाही, ज्यामुळे सर्व जण ढिगाऱ्याखाली दबले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kendra Trikon Rajyog: 12 महिन्यांनी शुक्र बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

SCROLL FOR NEXT