Rajasthan Accident : लग्नसोहळा आटोपून घरी परतताना काळाचा घाला; व्हॅन आणि ट्रक अपघातात ९ जणांचा मृत्यू

Rajasthan road Accident News : राजस्थानमधून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. राजस्थानच्या झालावाडमध्ये व्हॅन आणि ट्रकच्या भीषण अपघातात ९ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
Rajasthan Accident
Rajasthan Accident saam tv

राजस्थान :

राजस्थानमधून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. राजस्थानच्या झालावाडमध्ये व्हॅन आणि ट्रकच्या भीषण अपघातात ९ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. या अपघातामधील जखमींना रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील मृत प्रवासी हे मध्य प्रदेशातून येत होते. या अपघातातील प्रवाशांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या झालावाडमध्ये रस्ते अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव व्हॅन आणि ट्रकची एकमेकांना धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. या मृतांमध्ये वऱ्हाडी मंडळीचा समावेश आहे. लग्ना आटोपून घरी परतताना ही घटना घडली.

Rajasthan Accident
Delhi News : दोन मुलं मृतावस्थेत,आई रक्ताच्या थारोळ्यात; दिल्लीतील शशी गार्डन परिसरात नेमकं काय घडलं?

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर परिसरातील स्थानिक लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.

Rajasthan Accident
Accident News: भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक; भीषण अपघातात ४ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

या अपघातील प्रवाशांचे मृतदेह हे अकलेरा रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आले आहेत. अकलेरा पोलीस घटनास्थळी पोहोचली आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आलेली आहे. या मृतांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हरियाणात भिंत कोसळून ४ जणांचा मृत्यू

हरियाणातूनही दुर्दैवी घटना समोर आली आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये स्मशानभूमीची भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली दबून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत ६ जण जखमी झाले आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com